Cyber Police SIT arrests main accused Nilesh Waghmare in the Shalarth bogus ID scam; 680 teachers under scanner. Saam Tv
Video

Shalarth ID Scam: बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट; ६८० शिक्षकांना अटक होणार? VIDEO

Big Twist in Shalarth ID Fraud: बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात ६८० शिक्षकांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. सायबर पोलिसांनी मुख्य सूत्रधार निलेश वाघमारे याला अटक केली असून माजी उपसंचालक सतीश मेंढे फरार आहे. शिक्षण विभागात भीतीचे वातावरण आहे.

Omkar Sonawane

बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात ६८० शिक्षकांचा सहभाग उघड

मुख्य सूत्रधार निलेश वाघमारे याला एसआयटीकडून अटक

माजी उपसंचालक सतीश मेंढे अजूनही फरार

शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण

बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. सायबर पोलिसांनी आतापर्यंत तब्बल १,०८० शालार्थ आयडींची तपासणी केली असून यामध्ये ६८० शिक्षकांचे आयडी बोगस असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार नीलेश वाघमारे याला एसआयटीने अटक केली आहे. मात्र, प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी आणि माजी उपसंचालक सतीश मेंढे अद्यापही फरार आहे. याप्रकरणी १२ मार्च रोजी सायबर पोलिसांकडे पहिल्यांदा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तपास वेगाने सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात असून शिक्षण विभागातही यामुळे भीतीचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gaikwad: सिंहगडावरून तरुण बेपत्ता कसा झाला? ५ दिवसांत काय-काय घडलं, गौतम गायकवाडने सांगितला थरारक किस्सा

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना धक्का, बड्या नेत्याचा राजीनामा; शिंदे गटात जाणार

Ukraine Russia War: युक्रेनचा रशियाच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर ड्रोन हल्ला; रेडिएशनचा धोका,अण्वस्त्रयुद्धाची भीती

Aadhaar-Pan Card Update: आधार-पॅनमध्ये नाव, जन्मतारीख वेगवेगळी; कामं रखडतील, घरबसल्या करा दुरुस्त, सोप्या टिप्स

Shocking : ७ मुलांची आई भाच्याच्या प्रेमात झाली खुळी; नवऱ्याकडून ३ लाख घेऊन पळाली, दुसऱ्या गावात संसारही थाटला

SCROLL FOR NEXT