BJP and NCP form an alliance in Raigad, sidelining Shinde Sena ahead of local elections. saam tv
Video

Raigad Politics: महायुती तुटली; रायगडमधील राजकारण फिरलं,भाजप-राष्ट्रवादीचा शिंदेंना दे धक्का

BJP–NCP Alliance In Raigad: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने रायगडमध्ये युती केलीय. यामुळे राजकीय समीकरणे वेगाने बदलली आहेत. राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीमुळे शिंदे सेनेला धक्का बसलाय.

Bharat Jadhav

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. जागोजागी युती, आघाडीबाबत केल्या जात आहेत, तर काही ठिकाणी युत्या तुटू लागल्या आहेत. स्थानिक पातळीवर युती झाली तर युती करावी नाहीतर मैत्रीपूर्ण लढत लढावी, असं महायुतीमधील पक्ष श्रेष्ठींनी सुचना केल्या आहेत.

या सुचनेमुळे युती कमी आणि बिघाडी जास्त होताना दिसत आहे. तशीच एका बातमी रायगडमधून येत आहे. येथे महायुतीत बिघाडी झालीय. शिवसेनेला डाव सत्ता स्थापनेपासून राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चेत असलेल्या रायगड जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलंय.

महाडमध्ये शिवसेना शिंदे गटाला वगळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती केलीय. माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी याबाबत माहिती दिलीय. महाड नगर पालिकेत १५ जागा राष्ट्रवादी आणि 5 जागा भाजपला देण्यात येतील असं गणित ठरल्याची माहिती माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी दिलीय. तर नगराध्यक्ष पदाबाबत प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे घोषणा करणार आहेत.

आगामी नगरपालिका निवडणुकीच्या आधी महायुतीत मोठा राजकीय भूकंप झालाय. शिवसेना शिंदे गटाला वगळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) युती करण्याची घोषणा केली आहे. सर्वांगीण विकासाकरता आणि लोकांच्या असलेल्या समस्या सोडविण्याकरता आगामी होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी पक्ष आगामी निवडणुकीला संयुक्तरित्या आम्ही सामोरे जाणार असल्याची माहिती माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी दिली.

यंदाच्या स्थानिक पातळीवरील निवडणुका वेगळ्या स्वरुपाच्या असणार आहेत. महायुतीमधील तिन्ही पक्षातील अनेक नेत्यांनी आपला पक्ष सोडून आपल्या मित्रपक्षात प्रवेश केला. दुसरीकडे मविआमधील अनेक नेत्यांनी महायुतीत प्रवेश केलाय.

दुसरीकडे सोलापुरात एकनाथ शिंदे आणि शरद पवार गट एकत्र येणार आहेत. त्यामुळे रायगडनंतर येथे नवं राजकीय समीकरण उदयास येत आहे. आगामी कुर्डुवाडी नगरपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शरद पवार यांच्या पक्षात युती झालीय. ही युती माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मध्यस्थीने युती झालीय. दोन्ही पक्षांमध्ये ठरलेल्या रणनीतीनुसार, प्रत्येकी दहा जागांवर उमेदवार उभे राहणार आहेत. तसेच नगराध्यक्षपद शिवसेनेला देण्याचा निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Politics: भाजपची डोकेदुखी वाढली, अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली, नेमकं काय घडलं?

Pune Accident: नवले पुलावरून जाताना ब्रेक फेल, कंटेनर अनेक वाहनांना उडवत गेला; मृतांचा आकडा वाढण्याची भीती, थरकाप उडवणारा VIDEO

kalakand Recipe: संध्याकाळी गोड खायला आवडतं? मग, आज घरी नक्की बनवा हॉटेल स्टाईल कलाकंद, वाचा सोपी रेसिपी

Pune Navale Bridge Accident: काचांचा ढीग, वाहनं पेटली, ५ जणांचा जागीच मृत्यू पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात | VIDEO

Moisturizer For Winter: हिवाळ्यात तुमच्या त्वचेसाठी कोणता मॉइश्चरायझर आहे परफेक्ट, एकदा जाणून घ्या

SCROLL FOR NEXT