Rajendra Pipada News SaamTv
Video

Vikhe Patil Vs Pipada : विखे पाटलांचा मार्ग सुकर होणार? भाजपने बंडखोरासाठी थेट विमान पाठवलं!

Shirdi Assembly Constituency : शिर्डी विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपचे राजेंद्र पिपाडा आणि त्यांच्या पत्नीने बंडखोरी केल्याने त्याची दखल भाजप पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे.

Saam Tv

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. बैलगाडीत जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या बंडखोरासाठी भाजप पक्षश्रेष्ठींनी विमान पाठवलं आहे. भाजपचे राजेंद्र पिपाडा आणि त्यांच्या पत्नीने बंडखोरी करत विखे पाटलांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही बंडखोरी शमवण्यासाठी या अपक्ष उमेदवारांना भाजपकडून मुंबईत बोलावण्यात आलं आहे. यासाठी भाजपने शिर्डीत राजेंद्र पिपाडा आणि त्यांच्या पत्नीला घेण्यासाठी विशेष विमान पाठवण्यात आलं आहे.

शिर्डी विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. तर राजेंद्र पिपाडा हे विखे पाटलांचे पक्षांतर्गत विरोधक आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पिपाडा विखे पाटील यांच्यावर सातत्याने टीका करत होते. त्यानंतर त्यांनी बैलगाडीतून जाऊन स्वत:चा आणि आपल्या पत्नीचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्याची दखल घेत भाजप पक्षश्रेष्ठींकडून आज मुंबईत एक बैठक बोलावण्यात आली आहे. त्यासाठी सर्व बंडखोरांना बोलावण्यात आलं आहे. यावेळी पिपाडा आणि त्यांच्या पत्नीला घेण्यासाठी भाजपने विशेष विमान शिर्डीला पाठवलं आहे. त्यामुळे बैलगाडीतून उमेदवारी अर्ज भरायला गेलेल्या बंडखोराला घ्यायला विमान आल्याने याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan Tourism : कोकणात गेल्यावर 'या' किल्ल्याला नक्की भेट द्या, खूप कमी लोकांना माहितेय

Rule Change 1st January: थेट तुमच्यावर परिणाम, नव्या वर्षांपासून १० नियमात मोठा बदल, वाचा

Nana Patekar Birthday : शिट्ट्या अन् टाळ्या वाजवणारच, वाचा नाना पाटेकरांचे 5 दमदार डायलॉग

Maharashtra Live News Update : सोलापुरातील येडेश्वरी साखर कारखाना शेतकरी संघटनेने बंद पाडला

Corporation Election: संतप्त कार्यकर्त्यांनी भाजप खासदाराच्या कारला फासलं काळं; भागवत कराडांविरोधात घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT