Vijayraj Shinde News. SaamTv
Video

Vijayraj Shinde : बंड शमलं! बुलढाण्यातील बंडखोरी रोखण्यात महायुतीला यश, विजयराज शिंदेंची पहिली प्रतिक्रिया | Video

Buldhana Assembly Constituency : बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी रोखण्यात महायुतीला यश आलं आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार विजयराज शिंदे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

Saam Tv

बुलढाण्यातील बंडखोरी थांबवण्यात महायुतीला अखेर यश आलं आहे. भाजपाचे विजयराज शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता बुलढाण्यात शिंदेसेनेचे उमेदवार संजय गायकवाड यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा झाला आहे.

विधानसभेसाठी महायुतीकडून बुलढाण्याची जागा शिंदे गटाला सुटल्यानंतर भाजपाचे इच्छुक उमेदवार विजयराज शिंदे यांनी बंडखोरी कडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विजयराज शिंदे यांनी भाजपाकडे मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी देखील मागितली होती. मात्र ही परवानगी नाकारत शिंदे गटाचे उमेदवार संजय गायकवाड हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील असं त्यांना सांगण्यात आलं. त्यामुळे विजयराज शिंदे नाराज होते. मात्र आता बंडखोरीचा वाद मिटविण्यात अखेर महायुतीच्या नेत्यांना यश आलं आहे. आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी विजयराज शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे शिंदे गटाला बुलढाण्याचा मार्ग सुकर होणार आहे. काल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर विजयराज शिंदे यांनी ही माघार घेतली आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Exit Poll: सोलापूर दक्षिण मतदारसंघातून कोण होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Buldhana Vidhan Sabha : महायुतीच्या उमेदवारांकडून धमक्या; मविआकडून पोलिसात तक्रार, सुरक्षा देण्याची मागणी

Saam Exit Poll : अजित पवार की शरद पवार, चिपळूणमध्ये कौल कुणाला? एक्झिट पोल कुणाच्या बाजूने? VIDEO

Pune Cantonment Exit Poll : पुणे कॅन्टोनमेंटमध्ये रमेश बागवे आमदार होणार? पाहा Exit Poll

World Travel : स्वित्झर्लंडपेक्षा लय भारी भारतातील 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT