JP Nadda News  Saam tv
Video

JP Nadda News : भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पक्षाकडून नवी जबाबदारी?

JP Nadda News : भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पक्षाकडून नवी जबाबदारी सोपवण्याची शक्यता आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचाही अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आला आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्यावर पुन्हा नवी जबाबदारी सोपवण्याची शक्यता आहे. नड्डा यांना राज्यसभेतील नेता बनवले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या अधिवेशनात नड्डा यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी राज्यसभेत पियूष गोयल हे नेते होते. मात्र ते लोकसभा निवडणुकीत निवडून आल्याने ती जागा रिक्त झाली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी लोकसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत लोकसभा अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदा बाबत चर्चा झाली. या बैठकीला मंत्री अश्विनी वैष्णव, जेपी नड्डा, किरण रेजीजू यांच्यासह एनडीएमधील घटक पक्षातील नेतेही उपस्थित होते. लोकसभा अध्यक्ष पदाबाबतच्या निवडीची राजनाथ सिंह यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदिवासी विद्यार्थ्यांचं भंडारा प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन

Shocking : भाजप आमदाराच्या मुलीनं महिला पोलीस अधिकाऱ्याच्या कानाखाली मारली, वडिलांना मागावी लागली माफी

Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; अस्थमाच्या झटक्याने वयाच्या ४६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

स्वातंत्र्याच्या ८० वर्षांनंतरही विकास कागदावरच! मुंबईच्या शेजारील शहरात कमरेइतक्या पाण्यातून अंत्ययात्रा

Manifestation Tips : तुम्हाला मॅनिफेस्टेशनचे 'हे' ६ फायदे ठाऊक आहेत? स्वप्ने होतील झटक्यात पूर्ण

SCROLL FOR NEXT