Heavy police deployment outside BJP Nashik office amid protests by loyal workers over party entries. Saam Tv
Video

आयारामांच्या पक्षप्रवेशावरुन संकटमोचकासमोरच भाजप कार्यकर्त्यांचा तुफान राडा, घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा|VIDEO

Girish Mahajan presence BJP party entry: नाशिकमधील भाजप कार्यालयाबाहेर पक्षप्रवेशावरून मोठा गोंधळ पाहायला मिळाला. निष्ठावान कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

नाशिकमध्ये भाजप कार्यालयाबाहेर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेशाला विरोध करत नव्याने प्रवेश घेणाऱ्यांना रोखून धरल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या एक तासापासून माजी महापौर विनायक पांडे, मनसे नेते यतीन वाघ, काँग्रेस नेते शाहू खैरे आणि माजी आमदार नितीन भोसले हे भाजप कार्यालयाबाहेर प्रतीक्षेत होते. मात्र, स्थानिक निष्ठावान कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षप्रवेशावर आक्षेप घेतल्याने परिस्थिती चिघळली आहे.

नवे आणि जुने कार्यकर्ते आमने-सामने येऊ नयेत यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून, वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. भाजप कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पक्षप्रवेशाला नाशिक मध्यच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी कडाडून विरोध केला आहे. यानंतर फरांदे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये शहरातील रेडीसन ब्ल्यु या हॉटेलमध्ये बैठक पार पडली. यानंतर महाजन यांच्या उपस्थित या सगळ्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: CM फडणवीस यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी बैठक सुरू

Mayor Election: महापौर निवड कधी होणार? संभाव्य तारखा आल्या समोर; मुंबई, पुण्याचा कधी ठरणार?

Fruits Benefits: सतत अपचनाचा त्रास होतो? मग रोज 'हे' फळं खल्ल्याने सगळे त्रास होतील दूर

आधी ४ लेन, नंतर अचानक २ लेनचा झाला; मिरा-भाईंदरच्या १०० कोटींच्या फ्लायओव्हरच्या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Wednesday Horoscope: पैशाची तंगी भासेल, ५ राशींना कामात अडथळे येण्याची शक्यता; वाचा बुधवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT