

राज्यातील 95% अल्पसंख्याक शाळा बोगस असल्याचा आरोप
75 शैक्षणिक संस्थांना बेकायदेशीर प्रमाणपत्र वाटप
शासकीय दुखवट्याच्या काळात मंत्रालयातून हालचाली
अजितदादांच्या निधनानंतर एकीकडे राज्यात शासकीय दुखवटा असताना दुसरीकडे मंत्रालयातील काही अदृश्य हात अल्पसंख्याक दर्जाची खिरापत वाटण्यात मग्न होते. दादांच्या दुखवट्यातच मंत्रालयातून तब्बल 75 शैक्षणिक संस्थांना 'अल्पसंख्याक दर्जा'च्या प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. विशेष म्हणजे 12 ऑक्टोबर 2025 तत्कालिन मंत्री माणिकराव कोकाटेंनी या प्रमाणपत्र वाटपाला स्थगिती दिली होती.
कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर अजितदादांकडे हा विभाग आल्यानंतरही ही स्थगिती कायम होती. मात्र अजितदादांच्या निधनानंतर स्थगिती डावलून मंत्रालयातून कधी आणि कोणत्या संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आलाय. ते पाहूयात.
28 जानेवारीला दिवसभरात एकूण 7 संस्थांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं
श्री माता कन्यका सेवा संस्थेला दु. 3.09 वाजता प्रमाणपत्र
यवतमाळच्या सेवादास महाराज शिक्षण प्रसारक मंडळालाही प्रमाणपत्र
29 जानेवारीला
पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या 25 शाळांना प्रमाणपत्र
सेंट झेवियर्सच्या 5 शाळांना अल्पसंख्यांक दर्जा
स्वामी शांती प्रकाश आणि देवप्रकाश संस्थांच्या 4 शाळांना प्रमाणपत्रे
29 , 30 जानेवारी आणि 2 फेब्रुवारीलाही अनेक शिक्षण संस्थांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं.
दुसरीकडे बनावट किंवा चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्रे वाटप करण्यामागे 'गॉडफादर' कोण असा थेट सवाल युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी उपस्थित केलाय. तर महाराष्ट्रातील 95% अल्पसंख्याक शाळा बोगस आहेत. त्यामुळे याप्रकऱणाची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केलीय.
दरम्यान शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा हवा असतो कारण त्यामुळे मिळणारे फायदे
अल्पसंख्याक दर्जाचे फायदे
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना थेट प्रवेश
शिक्षक भरतीसाठी TET मधून सूट
RTE कायदा लागू होत नाही
पदोन्नती प्रक्रियेत सवलती
नुतनीकरण, इतर सुविधांसाठी कोट्यवधींचं शासकीय अनुदान
विविध कारणांसाठी देणगी घेण्याची मुभा
दुखवट्याच्या आड सुरू असलेला हा 'काळा बाजार' उघड झाल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी या सर्व प्रमाणपत्रांना स्थगिती देत चौकशीचे आदेश दिलेत.मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असली, तरी आता या प्रकरणाची पाळंमुळं खणून काढण्याचं आव्हान सरकारसमोर असणार आहे... त्यासोबतच राज्यात बोगस अल्पसंख्य़ाक शैक्षणिक संस्था किती ? या 75 फाईलींवर सही करणारा 'खरा मास्टरमाईंड'ला कोण आहे? याचा तपास लवकरात लवकर होणं गरजेचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.