SURESH DHAS VIRAL CALL RECORDING saam tv
Video

एक दिवशी हातपाय मोडेन; भाजप आमदार सुरेश धसांची जरांगेंच्या समर्थकाला धमकी, कथित ऑडिओने बीडमध्ये खळबळ|VIDEO

Suresh Dhas Alleged Threat Call Recording Viral Beed: बीडचे आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सोशल मीडिया टीमशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या तरुणाला फोनवरून हातपाय मोडण्याची कथित धमकी दिल्याचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Omkar Sonawane

योगेश काशीद, साम टीव्ही

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं सोशल मीडियाचं काम पाहत असल्याचा दावा करणाऱ्या एका तरुणाला आमदार सुरेश धस यांनी फोनवरून हात पाय मोडण्याची धमकी दिली आहे. याची कथित कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

कॉल रेकॉर्डिंग मधील संवाद -

आमदार सुरेश धस - तुम्ही पांढरीचेच आहात ना.

तुला त्या मनोज चौधरीचा पुळका कशासाठी रे बाबा समाजासाठी काम करतो म्हणतो.

मनोज चौधरी ने काय दिवे लावलेत समाजासाठी तू फोन केलता पाथरकर ला.

मला चेहरा दाखव तुझा तू माझ्यासमोर आलेला आहे का कधी.

तरुण : नाही अण्णा..

तरुण : बाळासाहेब जरांगे पाटलाचं काम करतात मीही जरांगे पाटलाचं सोशल मीडियाचं काम करतो.

तू सोशल मीडियाचं जरांगे पाटलाचं काम करतो आणि आमच्या आईला घोडा लावतो का ?

तरुण : नाही अण्णा तसं काही नाही.

तू समजतो काय स्वतःला.

तरुण : तसं नाही अण्णा.

माझ्या विरोधातल्या माणसांचा पुळका येतो तुला.

त्याचं तो जय गोपीनाथ जय भगवान गड म्हणतो.

आणि तू त्याला म्हणतो का हे समाजाचं काम करतो.

असं जरांगे पाटलाचं काम करतो का तू

तरुण : नाही अण्णा तसं काही मी बोलता बोलता म्हटलं..

तू कोणाचा समर्थक आहे काय आहे मला माहिती आहे..

आमच्या आ**ला घो* लावणाऱ्यांना तू त्रास देऊ नका म्हणतो.

मला तुला बघायचंय एका दिवशी

तरुण : नाही नाही अण्णा तसं काही नाही.

बाळासाहेब पाथरकर हा जरांगे पाटलाची बाजू घेतो तिकडे बजरंग सोनवणेची बाजू घेतो इकडं माझी बाजू घेतो.

आणि तू त्याला सांगतो का मनोज चौधरी समाजाचं काम करतो.

कुठलं समाजाचं काम केलं त्यानी..

तुला लाज कशी वाटली नाही मनोज चौधरी समाजाचं काम करतो म्हणायची.

त्यांनी कोणतं समाजाचं काम केलं रे त्याची यादी जरा मला पाठव तर.

तरुण : नाही नाही अण्णा तसं काही नाही

एक दिवशी त्याचे हात पाय मोडल्यानंतर तुझा नंबर लागू नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ५०-६० वर्षांपासून राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार- एकनाथ शिंदे

गोकुळ पाठोपाठ आता वारणाचेही दूध महागलं; कधीपासून लागू होणार नवे दर? किती रुपयांनी महागनार?

Late Night Food: रात्रीचे जेवण किती वाजता करावे? उशिरा जेवण्याची सवयीमुळे आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम!

सोन्याचा भाव घसरला, आजच लाडक्या लेकीसाठी बनवा हे 5 दागिने

Mumbai : लोणावळा-माथेरान विसरा! हिवाळ्यात मुंबईजवळील 'या' ६ निसर्गरम्य ठिकाणी प्लान करा वीकेंड पिकनिक

SCROLL FOR NEXT