CM Devendra Fadnavis news  Saam Tv
Video

Municipal Elections : पुणे, पिंपरीत भाजपचे 'एकला चलो रे', अजित पवार काय निर्णय घेणार?

CM Devendra Fadnavis Pune political meeting : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप एकटं लढण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे.

Namdeo Kumbhar

CM Fadnavis Pune Meeting : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपने एकटं लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. महापालिका निवडणुकीत भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली आहे. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाल्याचे समजते. येत्या आठवड्यात १० माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी माहिती समोर येत आहे. पुण्याच्या राजकारणात यामुळे मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुढील आठवड्यात राज्यात कोणत्याही क्षणी महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. पण महायुतीमधील जागावाटप अद्याप संपलेले नाही. १३ महापालिका निवडणुकींत पेच असल्याचे समोर आलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रॅपिडो बाईक चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; कल्याणमध्ये खळबळ

Sunday Horoscope : लॉटरीमध्ये भरपूर पैसा मिळेल; ५ राशींच्या लोकांसाठी रविवार गेमचेंजर ठरणार

Kolhapur IT Park: कोल्हापुरात होणार आयटीपार्क, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी

कर्नाटकात भाकरी फिरणार; शिवकुमार मुख्यमंत्री होणार, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

हाताने उखडला डांबरी रस्ता, ग्रामस्थांचा ठेकेदाराविरोधात संताप

SCROLL FOR NEXT