Eknath Shinde saam tv
Video

विधानभवनातील हाणामारी भोवणार; सरकारचा कठोर शब्दांत संदेश | VIDEO

Maharashtra Vidhan Sabha Fighting : महाराष्ट्र विधानभवनाच्या लॉबीमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेनंतर सरकार आणि विरोधकांकडूनही तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही प्रतिक्रिया दिली आहे.

Nandkumar Joshi

भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील शाब्दिक वाद विकोपाला गेला आणि तो विधानसभा परिसरातील हाणामारीपर्यंत पोहोचला. या दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानसभेच्या लॉबीमध्येच हाणामारी झाली. शिवीगाळ आणि कपडे फाटेस्तोवर कार्यकर्त्याला मारलं. या घटनेनंतर विधानसभा परिसरात एकच गोंधळ उडाला होता. या पवित्र वास्तूमध्ये घडलेल्या अशोभनीय आणि निंदनीय घटनेनं सर्व स्तरांतून टीका होत आहे. तर जनतेचे प्रतिनिधित्व करणारे आमदारच सुरक्षित नाहीत, तसेच ज्या ठिकाणी कायदे केले जातात, तिथेच कायद्याची पायमल्ली करण्यात आली, अशी जनभावना आहे. या घटनेनंतर संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी होत आहे.

सरकारनं ही घटना गांभीर्यानं घेतली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा अध्यक्षांनी हा प्रकार गांभीर्यानं घेतला आहे. यावर कडक कारवाई करावी, अशी सगळ्यांची भावना आहे. कारण शेवटी विधानभवन परिसर आहे. इथे कायदे केले जातात. सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम या विधानभवनातून होतं. म्हणून ही पवित्र वास्तू आहे. याचं पावित्र्य राखण्याचं काम केलं पाहिजे. सगळ्यांनाच विनंती आहे की या विधीमंडळ सभागृह आणि परिसराचे पावित्र्य सगळ्यांनी राखावे. या कालच्या घटनेबाबत अध्यक्ष कडक कारवाई करतील. मुख्यमंत्री आणि सरकारनेही ही घटना गांभीर्याने घेतली आहे, असे एकनाथ शिंदेंनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT