Nagar palika election result LIVE saam tv
Video

'थेट' भाजपच अव्वल! आतापर्यंत सर्वाधिक १०८ नगराध्यक्ष, एकनाथ शिंदेंची शिवसेना कितव्या स्थानी?

Maharashtra Nagar Parishad election result live Updates : नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी सुरू असून, थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचं वर्चस्व दिसून येत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, भाजपचे १०८ नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झालेले आहेत.

Nandkumar Joshi

नगर परिषदा आणि नगरपंचायतींचे निकाल जाहीर होत असून, आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, २८८ पैकी बहुतांश पालिकांमध्ये भाजप किंवा भाजप प्रणित महायुतीची सत्ता येण्याची शक्यता वाढली आहे. अनेक ठिकाणी भाजपच्या निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. तर थेट जनतेतून निवडून येणारे सर्वाधिक नगराध्यक्ष हे भाजपचे आहेत. आतापर्यंतच्या माहितीनुसार, भाजपचे सर्वाधिक १०८ नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

शिवसेनेने (शिंदे गट) देखील जबरदस्त मुसंडी मारली आहे. आतापर्यंत ४५ नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे २० नगराध्यक्षपदाचे उमेदवार निवडून आले आहेत. राज्यातील सत्ताधारी महायुतीचा वरचष्मा दिसत असला तरी, विरोधी महाविकास आघाडीपैकी काँग्रेस पक्षानेही बाजी मारल्याचे दिसते. काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे ३६ उमेदवार आतापर्यंत विजयी झालेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवावे, मन प्रसन्न राहील; ५ राशींच्या लोकांची दुप्पट वेगाने प्रगती होणार

Famous Actor Death: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते काळाच्या पडद्याआड; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Late Night Eating: रात्री पोटभर जेवणं पडेल महागात; डॉक्टरांचा इशारा, वाढू शकतात गंभीर आजार

Maharashtra News Live Update: CSMT ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस पुणे स्टेशनवर चौथ्या डब्याचा एक ट्रॉली घसरला.

ILS Law College: 'वसतिगृहात दारू आणि ड्रग्जच्या पार्ट्या', कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याचं रँगिंग

SCROLL FOR NEXT