bjp candidate son assault ncp worker pimpri chinchwad saam tv
Video

भाजप उमेदवाराच्या मुलाची अजित पवारांच्या कार्यकर्त्याला मारहाण, VIDEO

Pimpri Chinchwad Election : पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला भाजप उमेदवाराच्या मुलानं मारहाण केल्याची घटना घडलीय.

Nandkumar Joshi

गोपाल मोटघरे, पिंपरी-चिंचवड

महापालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. निवडणूक प्रचाराची सांगता होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यानंतर छुपा प्रचार सुरू होणार आहे. निवडणूक काळात भरमसाठ पैसा वाटला जात आहे, असा आरोप होत आहे. मतदारांना पैशांचे प्रलोभन दाखवून मते खरेदी करण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. तसे अनेक ठिकाणचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये तर पैसे वाटल्याच्या संशयावरून भाजप उमेदवाराच्या मुलानं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मारहाण केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात प्रभाग क्रमांक २१ मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नाणीक उर्फ नरेश पंजाबी यांच्या मुलाने एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मारहाण केली. मतदारांना पैसे वाटल्याच्या संशयावरून नाणिक उर्फ नरेश पंजाबी यांचा मुलगा मनीष पंजाब याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रदीप जगताप यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. प्रभाग क्रमांक २१ मधील वैभव नगर या ठिकाणी काल, रविवारी ही घटना घडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: मेष, सिंह, धनुसह या राशींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा; वाचा तुमच्या राशीचे भविष्य

Kelfulachi Bhaji : आहारात केळफुलाची भाजी का असावी? 'हे' ६ फायदे आताच घ्या जाणून

बिग बॉस मराठी फेमच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल; डॉक्टरांना घरात घुसून मारहाण अन्...; नेमकं प्रकरण काय?

620 पैकी 150 अधिकारी अजूनही मंत्र्यांच्या दालनात; 30 अधिकाऱ्यांचा शिंदेंचं कार्यालय सोडण्यास नकार?

AI च्या गैरवापरानं 100 कोटी मृत्यू; बिल गेट्स यांचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT