मुखेड विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार आमदार तुषार राठोड यांना मराठा समाजाने गावात येण्यास विरोध केल्याचं दिसून आलं आहे. मराठा अरक्षणा संदर्भात आपली भूमिका काय आहे, अशी विचारणा करत मराठा समाजाने आमदार तुषार राठोड यांना गावात येताच घेराव घालून जाब विचारला. यावेळी 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा देत अरक्षणासंदर्भात जाब विचारात मराठा ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. मुखेड तालुक्यातील होनवडज या गावातील हा प्रकार आहे. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीवर मराठा आरक्षणाचा मोठा परिणाम होताना दिसून येत आहे. निवडणुकी पूर्वीच मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झालेला दिसत आहे. मुखेड विधानसभा मतदारसंघात देखील मराठा समाज आक्रमक झालेला दिसून आला आहे. आमदार तुषार राठोड हे प्रचारासाठी मुखेडच्या होनवडज या गावात गेले होते. गावात जाताच मराठा समाजाने आमदार तुषार राठोड यांना घेराव घातला. मराठा अरक्षणा संदर्भात आपली भूमिका काय आहे, अशी विचारणा करत एक मराठा लाख मराठा आशा घोषणा यावेळी मराठा कार्यकर्त्यांनी दिल्या. त्यामुळे याठिकाणी प्रचंड गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर आमदार तुषार राठोड यांनी अखेर गावातून काढता पाय घेतला.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.