Ashish Deshmukh SaamTv
Video

Ashish Deshmukh : आशिष देशमुखांची डायलॉगबाजी, सुनील केदारांना सावनेर सोडण्याचं खुलं आव्हान, पाहा Video

Savner Assembly Constituency : भाजपचे उमेदवार आशिष देशमुख यांनी हिंदीतून डायलॉगबाजी करत कॉंग्रेसचे नेते सुनील केदार यांना सावनेर सोडण्याचं आव्हान केलं आहे.

Saam Tv

भाजपचे उमेदवार आशिष देशमुख यांनी कॉंग्रेसचे नेते सुनील केदार यांना सावनेर सोडण्याचं खुलं आव्हान केलं आहे. आशिष देशमुख यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर हिंदीतून डायलॉगबाजी करत सुनील केदार यांच्यावर निशाण साधला आहे. 'खीर मांगोगे तो दूध भी नही देंगे, जिल्हा छोडो केदार, ये सावनेर भी तुमसे छिन लेंगे'' असं आशिष देशमुख यांनी म्हंटलं आहे.

सावनेरमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चांगलीच रणधुमाळी तापलेली दिसत आहे. आशिष देशमुख यांचा डायलॉगबाजीचा एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल होत आहे. भाजप उमेदवार आशिष देशमुख यांचं कॉंग्रेस नेते सुनील केदार यांना आव्हान दिलं आहे. ''केदार जिल्हा छोडो सावनेर भी तुमचे छिन लेंगे… जो हात उठेंगे ओ हात काट डालेंगे, या दिवाळीत लंकेचा नाश झालाच पाहिजे'' अशी हिंदीतून डायलॉगबाजी आशिष देशमुख यांनी केली आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतानाचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओमधून खुलं आव्हान करत आशिष देशमुख सावनेर मतदारसंघाच्या मैदानात उतरलेले बघायला मिळत आहेत.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

SCROLL FOR NEXT