Biker stranded in flooded Panjara river as locals rush to rescue him from the overflowing Nandwad-Behed causeway in Dhule district. Saam Tv
Video

Dhule News: पांझरा नदीला पूर, दुचाकीस्वाराचा जीवघेणा प्रवास, स्थानिकांच्या मदतीनं बचावला; काळाजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Biker Crossing Flooded: धुळे जिल्ह्यातील पांझरा नदीला पूर आल्याने नांदवड-बेहेड पुलावरून जाताना दुचाकीस्वार अडकल्याची घटना घडली. प्रसंगावधान राखून गावकऱ्यांनी धाव घेत त्याचा जीव वाचवला.

Omkar Sonawane

धुळे जिल्हयातील साक्री तालुक्यात पांझरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला असताना अशा परिस्थितीमध्ये नांदवड-बेहेड फरशी पुलावरून दुचाकी नेण दुचाकी धारकाला चांगलंच महागात पडलं असतं, परंतु परिसरातील नागरिकांनी धाव घेत बचाव कार्य केल्यामुळे वाहून जाणारी दुचाकी व त्यावरील दुचाकी धारक सुदैवाने बचावला आहे. नांदवड-बेहेड गावांना जोडणाऱ्या फरशी पुलावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी पुराच्या पाण्यामधून फरशी पुलावरून प्रवास करू नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले असताना, याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करत पुराच्या पाण्यामधून प्रवास करणे या दुचाकी धारकाच्या जीवावर बेतले होते, परंतु सुदैवाने परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत बचाव कार्य करत या दुचाकी धारकाला वाचविले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dancing Car : आता काय म्हणावं? दोघांचा ताबा सुटला, दिवसाढवळ्या कारमध्येच जोडप्याचा रोमान्स, एकमेकांचे कपडे काढले अन्..., व्हिडिओ व्हायरल

गुंठाभर जमिनीचा ७/१२ सहज मिळणार, तुकडाबंदी कायदा रद्द करणार; सरकारची विधानसभेत घोषणा

पर्यटनासाठी लागणार तिकीट, धबधब्यावर जायचंय तर खटाखट पैसे मोजा; प्रशासनाचा निर्णय काय?

Ladki Bahin Yojana : नव्या लाडकींना लाभ मिळणार का? पोर्टल कधी सुरू होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update : सोमठाणा गावात स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांनी प्रेत ठेवले थेट ग्रामपंचायतमध्ये

SCROLL FOR NEXT