Tourists bravely rescue girls trapped in raging water flow near a Bihar waterfall – heroic act caught on camera. saam tv
Video

Viral Video: धबधब्यावर गेलेल्या 6 मुली वाहून गेल्या, पर्यटकांनी धाडस दाखवले अन् VIDEO

Tragedy Averted: बिहारमधील लुंगूरही टेकडीजवळ धबधब्याला आलेल्या पुरामुळे सहा मुली अडकल्या होत्या. पर्यटकांनी धाडस करत पाण्यात उतरून सर्व मुलींना वाचवलं.

Omkar Sonawane

सहलीसाठी गेलेल्या सहा मुलींना जीवघेणा प्रसंग ओढवला आहे. पाण्याचा जोरदार प्रवाह सुरु असताना या मुली त्यात अडकल्या आणि वाहायला लागल्या. एका मुलीनं कसंबस स्वतःचा जीव वाचवला, तर इतर मुलींना पर्यटकांनी वेळीच मदत करत वाचवलं. यामध्ये एका मुलीला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. बिहारमधील गया जिल्ह्यात ही घटना घडलीय.मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बिहार राज्यातील गयाजी जिल्ह्यातील इमामगंज ब्लॉक परिसरात घडली आहे. लुंगूरही टेकडीजवळील धबधब्याला अचानक पुर आल्याने तिथे सहलीला गेलेल्या सहा मुली पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. धबधब्याच्या अचानक वाढलेल्या पाण्यामुळे काही वेळातच परिसरात खळबळ उडाली. पुराच्या पाण्याचा वेग इतका होता की कोणालाही काहीच कळत नव्हते. मुली पाण्याच्या प्रवाहात वाहत गेल्या. मात्र तेथे असलेल्या तरुणांनी हिम्मत दाखवत थेट पाण्यात उतरून मुलींना सुखरूप बाहेर काढले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT