Monsoon Alert Saam Tv
Video

Monsoon 2026: मोठी बातमी! वेळेआधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार, हवामान खात्याने तारीख सांगितली

Monsoon Update: मान्सूनबाबत आनंदाची बातमी समोर आली आहे. मान्सून वेळेआधी अंदमान आणि महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. स्कायमेट या हवामान खात्याने हा अंदाज वर्तवला आहे.

Priya More

राज्यात उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण असतानाच मान्सूनबाबत आनंदाची बातमी समोर आली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे यंदा मान्सून अंदमानात निर्धारित वेळेच्या आधीच दाखल होण्याची शक्यता आहे. अंदमाननंतर मान्सून भारतात दाखल होतो. अंदमानात मान्सून वेळेआधी दाखल होणार असल्यामुळे तो भारतात वेळेवर दाखल होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

स्कायमेट या खासगी हवामान संस्थेकडून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याआधी १४ ते २२ मे दरम्यान मान्सूनच्या आगमनाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र स्कायमेटच्या अंदाजानुसार यंदा १४ मेपूर्वीच मान्सून अंदमानात धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रातही मान्सून वेळेआधीच पोहोचण्याची चिन्हे असून लवकरच नागरिकांची उकाड्यापासून सुटका होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT