Eknath Shinde And Minakshi Shinde saam tv
Video

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत ठाण्यात शिंदेंचा राजीनामा, राजकारणात पडद्यामागं मोठी घडामोड|VIDEO

Meenakshi Shinde Resignation News Thane: ऐन निवडणुकीच्या काळात ठाण्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी अंतर्गत वाद आणि कार्यकर्त्यांवरील कारवाईमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

ऐन निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. ठाण्यात शिवसेनेत अंतर्गत वाद चिघळल्याचं चित्र दिसत आहे. शिवसेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या प्रभागातील शाखाप्रमुख वायचळ यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

शाखाप्रमुख विक्रम वायचळ यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत पक्षाने कोणतीही पूर्वसूचना न देता निर्णय घेतल्याचा आरोप मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे. पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याने राजीनामा देण्याशिवाय पर्याय नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मीनाक्षी शिंदे काय म्हणाल्या पत्रात?

मी. सौ. मीनाक्षी राजेंद्र शिंदे, याद्वारे माझ्याकडे असलेल्या 'ठाणे जिल्हा महिला आघाडी जिल्हा संघटक या पदाचा राजीनामा सादर करत आहे.

आजवर पक्षाने माइयावर जो विश्वास दाखवला आणि मला काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी पक्षाची आणि सर्व वरिष्ठ नेत्यांची ऋणी आहे, वैयक्तिक कारणास्तव (किंवा सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून), मी या पदावर काम करण्यास असमर्थ असून, मी माझ्या पदाचा त्याग करत आहे, कृपया माझा राजीनामा स्वीकारण्यात यावा, ही विनंती धन्यवाद.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई ते पुणे प्रवास अधिक वेगवान, मुंबईहून ४८ मिनिटात पुण्यात पोचणार

Best Strike : मुंबईकरांचे हाल होणार, BEST चे हजारो कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर, या आहेत प्रमुख मागण्या

भिवंडी हादरली! चिकन शाओर्मा, पिझ्झा खाल्ल्याने १४ जणांना विषबाधा; अचानक उलट्यांचा त्रास अन्...

ट्रम्प झुकले, आखातात शांतता, इराण-अमेरिकेत 'व्हर्साय' करार, य़ुद्धबंदीच्या करारात नेमकं काय?

MLA Convoy Accident: विवाह समारंभातून परतताना आमदाराच्या ताफ्यातील वाहनांचा भीषण अपघात; ५ गाड्या एकमेकांवर आदळल्या

SCROLL FOR NEXT