Sanjay Shirsat saam tv
Video

Sanjay Shirsat: संजय शिरसाटांना मोठा दणका; वीट्स हॉटेल प्रकरणात सुपुत्र सिद्धांत यांचा अर्ज बाद|VIDEO

Siddhant Shirsat Failed To Pay Deposit: छत्रपती संभाजीनगरच्या वीट्स हॉटेलचा लिलाव सातव्यांदा रद्द करण्यात आला आहे. मंत्री संजय शिरसाट यांना मोठा दणका बसला आहे.

Omkar Sonawane

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या वीट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेला पुन्हा एकदा झटका बसला आहे. या हॉटेलची लिलाव प्रक्रिया सातव्यांदा रद्द करण्यात आली आहे. यामागचं कारण म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांनी निविदेसाठी आवश्यक असलेली अनामत रक्कम भरलेली नाही.

आज २० जून रोजी ही रक्कम भरण्याची अंतिम मुदत होती. मात्र मुदतीच्या आत पैसे न भरल्यामुळे लिलाव अर्ज रद्द करण्यात आला. लिलाव प्रक्रियेसाठी २५ टक्के रक्कम जमा करणं बंधनकारक होतं, मात्र तीही भरली गेली नाही.

दरम्यान, या लिलाव प्रक्रियेवर सातत्याने आरोप होत होते. या पार्श्वभूमीवर मंत्री संजय शिरसाट यांनी स्वतः या प्रक्रियेतून माघार घेत असल्याची घोषणा यापूर्वीच केली होती.

110 कोटींचे हे हॉटेल वीट्स 68 कोटी रुपयांमध्ये खरेदी करत असल्याचा आरोप संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर केला होता. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी शिरसाट यांनी दबावातून हे हॉटेल कमी किमतीत घेण्यास भाग पाडले होते. तसेच त्यांच्याकडे एवढे पैसे आले कुठून? असाही प्रश्न विचारला होता. या आरोपानंतर संजय शिरसाट यांनी लिलाव प्रक्रियेतून माघार घेत असल्याची घोषणा केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Nashik Rain: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर, रामकुंड परिसरात हुल्लडबाजांचा हैदोस|VIDEO

Success Story: उच्चशिक्षण घेऊनही गावची माती सुटेना, मावळचा तरूण करतोय कोंबडी पालनाचा व्यवसाय; महिन्याला लाखो रुपयांची कमाई

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

SCROLL FOR NEXT