Sanjay Shirsat: राज ठाकरेंना सगळ्या अंतर्गत गोष्टीची जाणीव आहे, त्यामुळे... संजय शिरसाट काय म्हणाले? VIDEO

Raj Thackeray Knows the Inside Politics: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे कधीच एकत्र येऊ शकत नाही असे परखड मत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.

आज सकाळपासूनच राज्याच्या राजकारणात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्याचं कारण म्हणजे राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत शिवसेनेसोबत युती होण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील त्याला दुजोरा दिला आहे. यानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाल्या आहे.

यावरच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरे यांना इतर संघटनेंनी आपल्यासोबत यावे हे उचित वाटत नाही हा आज पर्यंतचा इतिहास आहे. उद्धव ठाकरे यांचं महाविकासआघाडीशी ही कधी जमलं नाही, शरद पवार आणि कॉंग्रेससोबत देखील जमलं नाही आणि राज ठाकरे यांचं तर उद्धव ठाकरेंसोबत तर कधीच जमणार नाही. कारण त्यांना सगळ्या अंतर्गत परिस्थितीची जाणीव आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com