Shukra Gochar 2025: 'या' ३ राशींना होणार भलं; नोकरीत बढती आणि व्यवसायत होईल भरभराट

Shukra Gochar 2025: जातकांच्या जीवनात प्रेम, वैवाहिक जीवन आणि आर्थिक क्षेत्रात भरभराटी येणार आहे. त्याचे कारण म्हणजे, शुक्रवारी दुपारी शुक्र ग्रहाने हस्त नक्षता प्रवेश केलाय. ज्योतिषी हर्षवर्धन शांडिल्य यांच्या मते, या संक्रमणामुळे ३ राशींना विशेष लाभ होणार आहे.
Shukra Gochar 2025
Venus enters Hasta Nakshatra: Three zodiac signs to witness career growth, prosperity, and love success.saam tv
Published On
Summary
  • शुक्र ग्रहाने हस्त नक्षत्रात प्रवेश करताच तीन राशींचं भाग्य खुलणार

  • नोकरीत बढती आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता.

  • विवाहित जीवन, प्रेमसंबंध आणि नातेसंबंधात सकारात्मक बदल दिसण्याची शक्यता.

विवाहित जीवनात प्रेम, सौंदर्य, कला, विलासिता आणि सुख सोयी आणणाऱ्या शुक्र ग्रहाने शुक्रवारी आपले नक्षत्र बदलले आहे. ज्योतिषी हर्षवर्धन शांडिल्य यांच्या मते, हस्त नक्षत्रात शुक्र ग्रहाचे भ्रमण तीन राशींच्या करिअर, नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध आणि सुख सोयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची शक्यता आहे.

Shukra Gochar 2025
Diwali 2025: देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात 'या' राशी; दिवाळीमध्ये गडगंज श्रीमंत होणार व्यक्ती

वृषभ

हस्त नक्षत्रातील शुक्र राशीचे भ्रमण वृषभ राशीसाठी विशेष लाभकारी आहे. नोकरीत किंवा व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. पदोन्नती, बोनस, ऑफर मिळण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून किंवा प्रकल्पांमधून नफा मिळण्याची शक्यता आहे. घर, वाहन, कलात्मक वस्तू इत्यादींवर खर्च होण्याची शक्यता आहे.

कन्या

या संक्रमणामुळे कन्या राशीसाठी अनपेक्षित फायदे आणि संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात किंवा कामात, केलेल्या मेहनतीचं फळ मिळेल. भागीदारी, क्लायंट, ग्राहक आणि सहकाऱ्यांमधील संबंध सुधारतील. कला, डिझाइन, सौंदर्य सेवा, फॅशन इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष फायदे मिळू शकतात.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ नोकरी आणि व्यवसायात ः अनुकूल राहील. नवीन व्यवसाय करार, विस्तार किंवा नवीन प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. परदेशात विस्तार, उत्पन्नाचे स्रोत वाढणे किंवा गुंतवणूक योजनांमधून नफा मिळणे शक्य आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com