Sanjay Raut to join Shinde Shivsena soon MLA Bangar Claims saam tv
Video

Maharashtra Politics : संजय राऊतच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार, आमदाराचा खळबळजनक दावा, VIDEO

Sanjay Raut Latest News : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या दाव्यानं राजकारणात खळबळ उडाली आहे.

Nandkumar Joshi

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार शिंदे गटात जाणार असल्याच्या वृत्तानं राजकारण ढवळून निघालं असतानाच, शिंदे गटाच्या आमदारानं केलेल्या दाव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हेच येत्या काही दिवसांत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा आमदार संतोष बांगर यांनी केला आहे.

ठाकरे गटाचे दोन ते तीन खासदार आपल्या संपर्कात आहेत, असा दावा बांगर यांनी केला. मी त्यांना भेटलो आहे. तुमच्या मनासारखंच होईल, असं त्यांनीही मला सांगितलं आहे, असंही बांगर म्हणाले.

याशिवाय, उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे देखील येत्या काही दिवसांत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील असे ते म्हणाले.

दुसरीकडे, ठाकरे गटाचे काही खासदार शिवसेनेत जाणार असून, नेत्यांच्या संपर्कात असल्याच्या वृत्तानं खळबळ उडाली होती. त्यावर सर्व खासदारांनी एकत्रित येऊन पत्रकार परिषद घेतली आणि यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आम्ही सर्व खासदार हे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेसोबतच आहोत. ज्या कुणी हा दावा केला आहे, त्यांनी आधी स्वतःचा विचार करावा. महाराष्ट्रातील जनता सर्व बघत आहे. त्यांच्या पक्षातच वेगाने हालचाली सुरू आहेत. कुणाचं महत्व कमी केलं जात आहे, या गोष्टींचा त्यांनी सखोल विचार करावा. लोकसभेतील नऊ आणि राज्यसभेतील दोन खासदार असे ११ खासदार आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहोत, असं या खासदारांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आमदार, खासदार, नगरसेवक त्यांचेच आणि चापट मारून तुम्हाला मतदान करायला सांगतील, जैन मुनींचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: किल्ले रायगडावर व्यावसायिक अतिक्रमण ?

धुळ्यात अवैध देहविक्रीच्या व्यवसायावर पोलिसांचा छापा; झोपड्यांवरही बुलडोझर फिरवला

Loan Tips: पहिल्यांदा लोन घेत असताना कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे?

Weather Update : पुढील ४८ तास महत्त्वाचे! ऐन हिवाळ्यात मुसळधार पाऊस कोसळणार, कोणत्या राज्यांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT