Nashik Saam TV
Video

Nashik : बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावली महिला ,पहा थरारक VIDEO

Bibtya Scare in Nashik : शेतात चरणाऱ्या कोंबड्यांचा शिकार करण्यासाठी आलेला बिबट्या थेट अंगणात आला. अंगणात कपडे धुणाऱ्या एका महिलेच्या अचानक समोर बिबट्या आलेलं पाहून महिला खाली कोसळली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील डोंगर गावात अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. शेतात कोंबड्यांचा शिकार करण्यासाठी आलेला बिबट्या थेट घराच्या अंगणात शिरला, आणि त्या क्षणी अंगणात कपडे धुणाऱ्या एका महिलेच्या समोर अचानक उभा ठाकला. बिबट्याला समोर पाहताच घाबरून ही महिला खाली कोसळली. क्षणभरातच गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बिबट्या काही वेळ अंगणात घुटमळत राहिला आणि नंतर जंगलाच्या दिशेने पसार झाला. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या दृश्यांनी स्थानिक नागरिक हादरून गेले आहेत. वन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन परिसरात गस्त वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या बिबट्या वस्तीमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचं आणि तातडीने पिंजरा लावण्याचं काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

SCROLL FOR NEXT