bhiwandi spiderman viral video saam tv
Video

Video : तुंबलेलं पाणी काढायला आला खुद्द स्पायडर-मॅन, भिवंडीचा Spider-Man सोशल मीडियावर व्हायरल

Viral Video : मुंबई, ठाणे यांसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे अलर्ट देखील जाहीर झाला आहे. यादरम्यान सोशल मीडियावर भिवंडीतील स्पायडरमॅनचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

Yash Shirke

फैय्याज शेख, साम टीव्ही, प्रतिनिधी

भिवंडी शहरातील भाजी मार्केट तीन बत्ती नाका परिसरामध्ये दरवर्षी पाणी साचले जाते. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. त्याशिवाय पावसाच्या पाण्यामुळे अनेक दुकानदारांचे नुकसान होते. यामुळे भिवंडी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने यावर ठोस उपाययोजना करून यातून नागरिकांची आणि भिवंडीकरांची कायमची सुटका करावी यासाठी भिवंडीतील मुख्य बाजारपेठेत पाणी भरलेल्या पावसाचा पाण्याचा निचारा करण्यासाठी चक्क स्पायडरमॅन उतरून पाण्याचा निचारा करण्याचा प्रयत्न करताना दिसला.

भिवंडी शहर व ग्रामीण भागात रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्रच वाताहात झालेली आहे. भिवंडी ठाणे या जुन्या रस्त्यावर अंजुर फाटा, राहनाळ,पूर्णा, काल्हेर, कशेळी या मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणा वर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत.

राहनाळ गावाच्या हद्दीत होलीमेरी शाळा येथील रस्त्यावर सुमारे तीन फुटापर्यंत पाणी साचले आहे. ज्यामुळे येथे वाहतूक कोंडी झाली असून अनेक वाहन रस्त्यात बंद पडली आहेत, तर दुचाकी ढकलत बाहेर काढली जात आहेत. या मार्गावरील पाणी निचरा होणाऱ्या गटारीची स्वच्छता न केल्याने ही समस्या उद्भवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

अजित पवार विमान अपघाताला नवं वळण; रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT