Bhayandar News Saam Tv
Video

Mumbai News: 'मराठी अन् नॉनव्हेज खाणाऱ्याला घर मिळणार नाही'; मुंबईतील धक्कादायक घटना | VIDEO

Bhayandar House Discrimation Video Viral: भाईंदर पश्चिमेतील एका बिल्डिंगमधील व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये मराठी आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांना फ्लॅट मिळणार नसल्याचे असं सांगितलं आहे.

Siddhi Hande

भाईंदर पश्चिमेतील एका इमारतीत मराठी माणसाला घर नाकारण्यास आले आहे. भाईंदर पश्चिमेतील श्री स्कायलाइन इमारतीत मराठी आणि मासांहारी असल्याच्या कारणावरुन घर नाकारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काँग्रेस कार्यकर्ते रवींद्र खरात यांनी याबाबत आरोप केला आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये 'तुम्ही जर मराठी आणि नॉनव्हेज खाणारे असाल, तर तुम्हाला फ्लॅट मिळणार नाही,'असं बिल्डरच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे. याप्रकरणी खरात यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे मीरा-भाईंदरमध्ये गृहनिर्माण संस्थांमधील भेदभावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

SCROLL FOR NEXT