bhaskar jadhav Saam Tv
Video

Maharashtra Assembly: लक्षवेधी मांडण्यासाठी सत्ताधारी आमदार पैसे देतात; भास्कर जाधव यांचा खळबळजनक आरोप, VIDEO

Shocking Allegation: ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आज विधानसभेत महायुतीच्या आमदारांवर एक गंभीर आरोप केला आहे.

Omkar Sonawane

राज्याचे विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यंदाचे अधिवेशन चांगलेच वादळी ठरले. आज ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात एक खळबळजनक आरोप केला. काही सत्ताधारी आमदार हे विधानसभा अध्यक्षांच्या कर्मचारांच्या ऑफिसात गेले आणि लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजेत असं सत्ताधारी आमदारांनी विचारलं. भास्कर जाधव म्हणाले, काल काही सत्ताधारी आमदार विधानसभा अध्यक्षांचे जे कर्मचारी आहेत. त्यांच्या ऑफिसमध्ये गेले आणि विचारले. लक्षवेधी लावण्यासाठी तुम्हाला किती पैसे पाहिजे ते सांगा आणि माझी लक्षवेधी लावा असा गंभीर आरोप भास्कर जाधव यांनी केला.

एका वर्तमान पत्रात ही बातमी आल्याचा पुरावा देत त्यांनी यावर चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जनतेने एवढ्या मतांनी जनतेने आपल्याला निवडून दिले आहे. विधानसभा अध्यक्ष असताना असे आरोप करणे कितपत योग्य आहे? हे रेकॉर्डवरुन काढून टाकण्याची मागणी त्यांनी केली. तसेच भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांना भेटून जे काही पुरावे आहे ते द्यावे जो कोणी असेल त्याच्यावर कडक कारवाई करू असे अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: 8वा वेतन आयोगावर मोठी अपडेट; कर्मचाऱ्यांना थकबाकीचे किती पैसे मिळणार? समजून घ्या संपूर्ण गणित

70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा पुन्हा चर्चेत;अपने गिरेबान में झाँक के देखिए”… अजित पवारांवर रवींद्र चव्हाणांचा हल्लाबोल

Makar Sankranti Date : १४ की १५ जानेवारी, मकर संक्रात नेमकी कधी? तारीख अन् शुभ मुहूर्त एका क्लिकवर

Maharashtra Live News Update: अखेर सावित्री वाणी यांना मशाल चिन्ह मिळणार

दादांच्या होर्डिंगवर काकांचा फोटो, फोटोवरुन अजित पवारांचं सूचक वक्तव्य, निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?

SCROLL FOR NEXT