Bhandara Rain SAAM TV
Video

Bhandara Rain : ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, भंडाऱ्यात मुसळधार पाऊस |VIDEO

Heavy Rain In Bhandara : भंडाऱ्यातील शास्त्री चौक जलमय झाला असून महिला समाज शाळा परिसरात पावसाचं पाणी शिरल्याने विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भंडा-यात पहाटेपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली.पहाटे सुमारे दोन तास पावसानं अक्षरश: धुमाकुळ घातला. शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. शहरातील शास्त्री चौक जलमय झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोर जावं लागत आहे. महिला समाज शाळा परिसरात पावसाचं पाणी शिरलं आहे. यामुळे या शाळेला सध्या तलावाचं स्वरूप आलं आहे. शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांना आत बाहेर जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत आणखी पावसाचा इशारा दिला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT