BEST EMPLOYEES BEGIN INDEFINITE HUNGER STRIKE OVER 7TH PAY COMMISSION DEMAND saam tv
Video

Mumbai: सातवा वेतन आयोगासाठी बेस्ट कर्मचारी आक्रमक; आजपासून बेमुदत उपोषण

BEST Employees Indefinite Hunger Strike For 7th Pay Commission: बेस्ट कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्यासह प्रलंबित वेतन करार, समान कामासाठी समान वेतन आणि खासगीकरणाला विरोध अशा विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

Omkar Sonawane

बेस्ट उपक्रमाच्या खाजगीकरण आणि मालमत्ता विक्रीच्या प्रस्तावाविरोधात बेस्ट वर्कर्स युनियनने उद्यापासून उपोषणाचा इशारा दिला आहे. महापालिकेच्या विशेष सभेत २२ आगारांच्या विकासाचा प्रस्ताव मांडला जाणार असून, यावर भाजप-शिवसेनेने व्हिप जारी केला आहे. बेस्ट उपक्रमाच्या मालमत्ता विक्रीला शशांक राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियनने विरोध केला आहे. तसेच बेस्ट कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, वेतन करार तातडीने करणे आणि वेट लीज कर्मचाऱ्यांना समान कामासाठी समान वेतन देण्यासह विविध मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांच्या नेतृत्वात ऑपेरा हाऊस येथे हे आंदोलन होणार आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा बेस्टच्या सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT