Viral fundraising banner for Valmik Karad in Beed with photos of three political leaders. Saam Tv
Video

Walmik Karad: तीन बड्या नेत्यांच्या फोटोसह वाल्मीक कराडचा फोटो, बीडमधील निधी गोळा करणारा बॅनर चर्चेत|VIDEO

Fundraising Banner For Valmik Karad: बीडमधील संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडसाठी आर्थिक साहाय्य गोळा करण्यासाठी सोशल मीडियावर व्हायरल झालेले बॅनर चर्चेचा विषय ठरला आहेत.

Omkar Sonawane

बीड: सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या नावाने सध्या सोशल मीडियावर आर्थिक निधी गोळा करण्यासाठी बॅनर व्हायरल होत आहेत. वाल्मीक (अण्णा) कराड संघटना मित्र मंडळ मजबूत करण्यासाठी तसेच सोशल मीडियावर वाल्मीक अण्णाचे नाव व चेहरा सातत्याने टिकून राहण्यासाठी आपले आर्थिक साहाय्य फार महत्त्वाचे आहे.

फुल ना फुलाची पाकळी दान करून मदत करा. तेव्हाच अण्णा आपल्यामध्ये एक दिवस येतील. थोडीशी मदत.. आण्णासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी अशा मजकुराचे हे बॅनर सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सोबत फोन पे चे स्कॅनर देखील लावण्यात आले आहे. जे संदीप गोरख तांदळे नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्याचे आहे.

संदिप तांदळे या व्यक्तीने आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड आणि विजयसिंह बांगर यांना व्हिडिओ बनवून खुलेआम धमकी दिली होती. एवढेच नाही तर सावरगाव येथील भगवान भक्ती गडावर याच संदीप तांदळे याने वाल्मीक कराडच्या फोटो झळकावला होता. आता मदत निधीचे बॅनर व्हायरल झाल्यानंतर हे बॅनर कोणी तयार केले. त्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी भगवान भक्ती गडाच्या ट्रस्टने केली आहे. दरम्यान याप्रकरणी अंमळनेर पोलिसात तक्रार देखील देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Director Arrested: ३० कोटींच्या फसवणुक प्रकरणात चित्रपट दिग्दर्शक आणि पत्नीला अटक; काय आहे नेमकं प्रकरण?

Goa Nightclub Fire: गोव्याच्या नाईट क्लबमध्ये 'अग्नीतांडव' नाईट क्लबला आग कशी लागली?

Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला हादरा; बडा नेता फोडला, राजकीय समीकरण बदलणार

Maharashtra Live News Update: मुंढवा अमेडिया जमीन खरेदी खत व्यवहारातील मुद्राक दुय्यम निबंधक अधिकारी रवींद्र तारु यांना अटक

लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर... अजित पवारांचा आमदार नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT