Beed Crime News Today: बीडमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. बीडमधील लाचखोर अभियंत्याकडे तब्बल २ किलो सोने आणि रोकड आढळून आलीय. त्यामुळे एकच खळबळ उडालीय. आर्थिक गुन्हे शाखेचे लाचखोर पोलीस अधिकारी हरिभाऊ खाडे यांच्या घरात कोटींचे घबाड सापडल्यानं बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पुन्हा पाटबंधारे विभागाचे लाचखोर कार्यकारी अभियंता असलेले राजेश सलगरकरच्या लॉकरमध्ये तब्बल 2 किलो सोने अन् रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे. राजेश सलगरकर यांच्या मिरज येथील बँकेच्या लॉकरमधून ही सोन्याची बिस्कीटं सापडली आहेत. बीडच्या परळी शहर पोलीस ठाण्यात लाचखोरी प्रकरणी आरोपी राजेश आनंदराव सलगरकर, कार्यकारी अभियंता माजलगाव पाटबंधारे विभाग, परळी यांच्यावर गुन्हा दाखल आहे. त्याच्या सांगली जिल्ह्यातील मिरज येथील युनियन बँक ऑफ इंडिया बँकेतील लॉकरची झाडाझडती घेण्यात आली. त्यावेळी रोख रक्कम 11 लाख 89 हजार रुपये आणि 2 किलो 105 ग्रॅम सोने ज्याची किंमत अंदाजे 1 कोटी 50 लाख असल्याचं सांगितलं जातंय. अशा प्रकारे एकूण 1 कोटी 61 लाख 89 हजार रुपयाची मालमत्ता आढळून आलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.