Santosh Deshmukh Case SaamTv
Video

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरण; बीड पोलिसच चौकशीच्या फेऱ्यात | VIDEO

Beed Crime News : संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता तपास करणाऱ्या पोलिसांचीच चौकशी केली जाणार आहे. यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.

Saam Tv

बीडचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता पोलीसच चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत. निवृत्त न्यायाधीश ताहलीयानी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती पोलिसांची चौकशी करणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण पोलिसांनी कसं हाताळलं याची चौकशी करून येत्या तीन ते सहा महिन्यात ही समिती त्याचा आहाल सादर करणार आहे. तसंच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपत्कालीन आणि दीर्घकालीन उपाय सुचवणे या मुद्यांवर ही समिती चौकशी करणार असल्याचं समजत आहे.

मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक सदस्यीय समितीकडून पोलिसांची चौकशी केली जाणार आहे. संपूर्ण घटनाक्रम, त्याची कारणे आणि परिणाम याचा अभ्यास समिती करणार आहे. कोणती व्यक्ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जबाबदार होती याचा तपास केला जाणार आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलिसांचं नियोजन योग्य होतं का? परिस्थिति हाताळण्यासाठी पोलिसांनी उचललेली पावलं योग्य होती का? याची देखील चाचपणी या समितीकडून होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death : राजीव गांधींची हत्या झाली तशीच अजित पवारांची झाली का? राष्ट्रवादीच्या आमदाराचे ८ सवाल

Maharashtra Live News Update: मातंग समाज पुन्हा आक्रमक,अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उमटणार पडसाद

Success Story: आधी CA, मग IPS, नंतर IAS अधिकारी; माधव अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास

T20 World Cup 2026: 'या' चुकीमुळे टीम इंडियाच्या हातातून निसटला सामना; पराभवानंतर सूर्यादादा संतापला

Misal Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी झणझणीत मिसळ कशी बनवायची? वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT