Beed News SaamTv
Video

Beed News : बीडमध्ये संविधान बचाव जनआक्रोश मोर्चा, पाहा Video

Somnath Suryawanshi Case : परभणी येथील घटनेचा निषेध व्यक्त करत आज बीडमध्ये संविधान बचाव जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली.

Saam Tv

परभणी येथील घटनेचा निषेध व्यक्त करत, बीडमध्ये आंबेडकरवादी संघटनेच्यावतीने, संविधान बचाव जनआक्रोश मोर्चाचे आयोजन सोमवारी करण्यात आले आहे. या मोर्चाला आता बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात झाली असून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.

या मोर्चाच्या माध्यमातून, सोमनाथ सुर्यवंशीच्या हत्येस जबाबदार पोलीसांवर गुन्हे दाखल करा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणारे गृहमंत्री अमित शहा यांची मंत्री मंडळातुन हकालपट्टी करा, परभणी येथील महिलांवर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलीसांवर गुन्हे दाखल करा, देशातील सर्व निवडणूका मतपत्रिकेवर घ्या, शासकिय नोकरीतील गुत्तेदारी पध्दती रद्द करुन कायमस्वरुपी नौकरी द्या व रिक्त असलेल्या राखीव जागा त्वरीत भरा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणारी भारत सरकार शिष्यवृत्ती दरमहा वेळेवर द्या, शासकिय सेवेतील आरक्षणामधील वगर्गीकरण कायदा रद्द करा, शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करा. या प्रमुख मागण्या करण्यात येत आहेत. दरम्यान, यावेळी मोर्चेकऱ्यांच्या हातामध्ये विविध फलक पाहायला मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांकडून शहरात नाकाबंदी!

Vande Bharat Train : झणझणीत मिसळ अन् चविष्ट पुरणपोळी, आता वंदे भारतमध्ये मराठमोळं जेवण

Early cancer symptoms: कॅन्सरचा धोका कसा ओळखाल? ही ८ लक्षणं वारंवार देतात संकेत, दुर्लक्ष करू नका!

Nidhhi Agerwal : संतापजनक! धक्काबुक्की अन् गैरवर्तन केले; अभिनेत्रीला चाहत्यांकडून वाईट वागणूक, VIDEO पाहून राग अनावर होईल

BOI Recruitment: खुशखबर! बँक ऑफ इंडियात नोकरी अन् १.२० लाख रुपये पगार; अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय? वाचा

SCROLL FOR NEXT