Rohit Pawar At Baramati Police Station saam tv
Video

Ajit Pawar Death: अजितदादांच्या अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करा, बारामतीकर आक्रमक; पोलिस ठाण्याबाहेर मोठी गर्दी

Rohit Pawar At Baramati Police Station: अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आमदार रोहित पवार हे बारामती पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. यावेळी बारामतीकरांनी पोलिस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली.

Priya More

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी आमदार रोहित पवार आज बारामती तालुका पोलिस ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत. यावेळी रोहित पवार यांच्यासोबत त्यांचे वडील राजेंद्र पवार आणि युगेंद्र पवार हे देखील आहेत. बारामती पोलिस स्टेशनबाहेर बारामतीकरांनी मोठी गर्दी केली आहे. एफआयआर दाखल करून घेण्यात यावी यासाठी बारामतीकर आक्रमक झाले आहेत.

यावेळी 'एकच वादा अजितदादा', 'अमर रहे अमर रहे अजितदादा अमर रहे', 'परत या परत या अजितदादा परत या', अशा घोषणा बारामतीकर देत आहेत. आमच्या दादांना न्याय मिळवून द्यावा ही विनंती बारामतीकरांनी केली आहे. हा लढा सामान्य लोकांचा आहे. नेत्यांनीही या लढ्याला पाठिंबा द्यावा, असे रोहित पवार यांनी सांगितले. दरम्यान याप्रकरणी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात बुधवारी आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरींनी एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेण्यास नकार दिला होता. यावरुन पोलिस आणि रोहित पवारांमध्ये वाद झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

Kangana Ranaut: महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या चारित्र्याचीच चर्चा का? कंगना रणौतचा थेट सवाल

Blackhead Removal Home Remedies: ब्लॅकहेड्समुळे चेहरा दिसतोय खराब? 'हे' ५ उपाय करा; मिळेल नॅचरल सॉफ्ट फेस

National Film Awards : ७२ वर्षांचा इतिहास बदलला; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरातमध्ये होणार

Tuesday Horoscope: कामाच्या ठिकाणी ताण वाढेल, ७ राशींचा खर्च कमी होणार; वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT