Sharad Pawar and Sunetra Pawar Saam tv
Video

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार? बारामतीमधील बॅनरवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

NCP Political News : राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा बारामतीमधील एका बॅनरमुळे रंगली आहे. या बॅनरवरून राष्ट्रवादीची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Vishal Gangurde

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याआधी सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात बारामतीत राष्ट्रवादीचा मेळावा होत आहे. या मेळाव्यात महायुतीमधील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आहे. या मेळाव्यातील एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. राष्ट्रवादीच्या मेळाव्यातील मुख्य बॅनरवर शरद पवारांचा देखील फोटो असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना वेग येणार असल्याची चर्चा रंगली आहे. बॅनरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या फोटोनंतर खासदार शरद पवार यांचा फोटो पाहायला मिळत आहे. बॅनरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दुसऱ्या कुठल्याच नेत्याचा फोटो नाही. महायुतीच्या नेत्यांच्या फोटोसोबत शरद पवारांचा फोटो असल्याने ही चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Rule: मोठी बातमी! १ मेपासून एलपीजी सिलिंडरच्या नियमात मोठे बदल, सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

पावसाच्या प्रत्येक थेंबाची अचूक नोंद होणार, पुण्यातील दाम्पत्यानं बनवलं 'पर्जन्यमापक यंत्र'

मानखुर्दमध्ये क्रेन कोसळली, मुंबईची वाहतूक 22 तास ठप्प

कामगारांच्या नोकरीवर टांगती तलवार? कामगारांवर आता कायद्यानं कुऱ्हाड

Maharashtra Din 2026 Wishes: जय जय महाराष्ट्र माझा! प्रियजनांना पाठवा हे खास मेसेज; मराठी, हिंदी, इंग्रजी WhatsApp स्टेटस वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT