Pune Drugs News Saam TV
Video

Pune Drugs News : पुणे ड्रग्ज प्रकरणी काय काय कारवाई केली? पुणे पोलिसांनी दिली माहिती

पुणे ड्रग्ज प्रकरणी पोलिसांनी तो बार सील केला आहे. तसेच या पार्टीतील सर्व लोकांना ताब्यातही घेतले आहे.

Tushar Ovhal

पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात पोलिस ॲक्शन मोडवर आहे. या प्रकरणी पोलिसांनी बारवर कारवाई केली असून गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस उपायुक्त संदिप गिल यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी सविस्तर माहिती दिली. गिल म्हणाले की पुण्यातील एफ सी रोड वर असलेल्या एल ३ नावाचा एक बार आहे. हा बार दिलेल्या वेळे पेक्षा अधिक वेळेपर्यंत सुरू होता. दोन मालकांनी हा बार पुढे तीन जणांना चालवायला दिला होता. एका इव्हेंट मॅनेजर ने ४० ते ५० लोकांना तिथे पार्टी करण्याची परवानगी हॉटेल मालकांकडून घेतली होती. रात्री दीडनंतर बारचे मुख्य प्रवेश द्वार बंद केले आणि दुसऱ्या गेटने तिथे आत जाण्याची परवानगी दिली होती. या प्रकरणी सर्व जणांना ताब्यात घेतले आहे. हा बार सील करण्यात आला आहे. तसेच जो व्हिडीओ व्हायरल होतो आहे तो पदार्थ कोणता आहे हे अमली पदार्थ विरोधी पथक तपास करत आहे असेही गिल यांनी नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT