Onion Price saamtv
Video

Oninon Import Duty: बांग्लादेशनं वाढवलं भारताचं टेन्शन; आयात शुल्कामुळे कांदा उत्पादक बेजार

Bangladesh Import Duty On Onion: कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्कामुळे हैराण असलेल्या कांदा उत्पादकांना आता बांग्लादेशने मोठा झटका दिलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

बांग्लादेशने कांद्याच्या आयातीबाबत घेतलेल्या निर्णयामुळे भारतीय शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. बांग्लादेशचा निर्णय नेमका काय आहे? आणि त्याचा भारतावर कसा परिणाम होणार? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. देशातील कांद्यावर 20 टक्के निर्यात शुल्काने हैराण झालेल्या कांदा उत्पादकांची बांग्लादेशाने डोकेदुखी वाढवलीय.

बांग्लादेशच्या युनूस सरकारने आयात कांद्यावर 10 टक्के कर लावण्याचा निर्णय घेतलाय.. त्यामुळे कांद्याचे दर गडगडण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय. मात्र बांग्लादेशातील आयात शुल्कामुळे नाशिकच्या शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलंय.. त्याचं नेमकं कारण काय? पाहूयात.

चीन आणि पाकिस्तानचा जागतिक कांदा मार्केटवर कब्जा

बांग्लादेश हा भारतीय कांद्यांचा सर्वात मोठा आयातदार

एकूण उत्पादनाच्या तब्बल 20 टक्के कांदा बांग्लादेशला निर्यात

बांग्लादेशातील कांद्याला संरक्षण देण्यासाठी 10 टक्के आयात शुल्काचा निर्णय

बांग्लादेशने कांद्यावर आयात शुल्क लावल्यानंतर आता कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क मागे घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये उत्पादित होणाऱ्या तीनशे लाख टन कांद्यापैकी 40 टक्के कांद्याचं उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होतं...मात्र आता बांग्लादेशने कांद्यावर आयात शुल्क लागू केल्याचा मोठा फटका राज्यातील कांदा उत्पादकांना बसलाय.

बांग्लादेशच्या निर्णयानंतर 40 रुपयांवर असणारा कांद्याचा दर 22 रुपयांवर आलाय.. एरव्ही ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय.. त्यामुळे सरकारने धोरणात्मक तोडगा काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यायला हवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ शिवसेनेकडून व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

SCROLL FOR NEXT