Baloch Liberation Army Targets saam tv
Video

Baloch Army Strikes: पाकिस्तानविरोधात बलुच आर्मी आक्रमक, ISI एजंटला ठार मारलं; पाक सैन्यांना दिला इशारा|VIDEO

BLA Strikes: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर युद्ध आणि विनाशाची टांगती तलवार लटकताना दिसत आहे.

Omkar Sonawane

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर युद्ध आणि विनाशाची टांगती तलवार लटकताना दिसत आहे. दुसरीकडे पाकिस्तान आपल्या भूमीवर स्वतःच्या एजंट आणि सैनिकांचेही रक्षण करू शकलेला नाही. बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) पुन्हा एकदा पाकिस्तानला हादरवून टाकले आहे. बलूचने पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISI च्या एका एजंटचा खात्मा केला आहे. हा हल्ला पासनी भागात करण्यात आला आहे.

BLA च्या माहितीनुसार, इतर तीन कारवायांमध्ये बलुच आर्मीने पाकिस्तानच्या सैन्य, पोलिस दल व सैंदक प्रोजेक्टशी संबंधित वाहनांना लक्ष्य केले असून मुख्य राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदीही केली आहे.

बलुच लिबरेशन आर्मीने जाहीर केले आहे की, त्यांनी ठार केलेल्या ISI अधिकाऱ्याचे नाव मुहम्मद नवाज असून तो पंजाबमधील खुशाब जिल्ह्यातील चोरंगी जोहराबादजवळील हकीम वाला गावाचा रहिवासी होता. हा एजंट ग्वादरजवळील पासनी शहरात एका गुप्त मोहिमेदरम्यान मारला गेला. या हल्ल्यात ISI एजंट आपल्या पथकासोबत प्रवास करत होता. हल्ल्यात सलमान नावाच्या दुसऱ्या एजंटचा देखील मृत्यू झाला असून शाह नजर नावाचा एजंट जखमी झाला आहे. त्यांच्या वाहनाचा पूर्णपणे नायनाट करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Gain : वजन वाढवण्यासाठी गाईचे दूध प्यावे की म्हशीचे दूध?

Dahi handi : एक गाव-एक दहीहंडी! पण फोडण्याची हटके पद्धत, इथे विहिरीत उडी मारून फोडली जाते दहीहंडी; Video

Maharashtra Live News Update: इंदापूरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, 17 हुन अधिक नागरिकांचा घेतला चावा

Famous Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; पुण्यात घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीत शोककळा

Home Loan : होम लोन घेणाऱ्यांना जोरदार झटका! देशातील सर्वात मोठ्या बँकेनं वाढवले गृहकर्ज व्याजदर, EMI वाढणार

SCROLL FOR NEXT