Badlapur citizens and MNS workers thrash migrant youth for abusing civic staff and insulting Marathi language. Saam Tv
Video

मराठी- अमराठीचा मुद्दा पुन्हा पेटला! मराठीबद्दल अपशब्द काढला, परप्रांतियाला मनसैनिकांनी चोपला; पाहा VIDEO

Badlapur Clash: बदलापूरमध्ये एका परप्रांतीय तरुणाने नगरपरिषद अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून मराठी भाषेबद्दल अपशब्द काढले. यानंतर संतप्त नागरिक व मनसे कार्यकर्त्यांनी त्याला बेदम चोप दिला.

Omkar Sonawane

मयुरेश कडव , साम टीव्ही

बदलापुरात मनसे कार्यकर्त्यांनी एका परप्रांतीयाला चांगलाच चोप दिलाय. मराठीचा अपमान केल्याप्रकरणी तसेच पालिका कर्मचाऱ्यांशी हाणामारी केल्याबद्दल संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी या परप्रांतीयाचा चांगलाच समाचार घेतलाय.

बदलापूर पश्चिमेकडील ट्रेंड्स शॉप समोर सकाळच्या सुमारास काही फळ विक्रेत्यांवर नगरपालिकेचे कर्मचारी कारवाई करत होते. त्यावेळी एका परप्रांतीय विक्रेत्याने कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली तसंच त्यांच्यावर हल्लाही केला. या झटापटीत एक कर्मचारी जखमी झालाय. यावेळी या परप्रांतीय विक्रेत्याने मराठी भाषेचा अपमान केल्याचा आरोपही करण्यात येतोय.

त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत या विक्रेत्याला माफी मागण्यास सांगितलं. मात्र त्याने माफी मागण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या मनसे कर्मचाऱ्यांनी खळखट्याक स्टाईल या परप्रांतीय विक्रेत्याची धुलाई केली. त्याचाच व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. बदलापुरात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय फळ विक्रेते आहेत. त्यांची मुजोरी वाढत असल्याच्या तक्रारी वारंवार नागरिकांकडून येत होत्या. या परप्रांतीयांमध्ये बांगलादेशींचं प्रमाणही अधिक असल्याचं सांगण्यात येतय. त्यामुळे या फळ विक्रेत्यांची पार्श्वभूमी तपासून पाहावी अशी ही मागणी नागरिकांमधून होतीय. तर यापुढे मराठीचा अवमान केल्यास, त्यांना मनसे स्टाईल उत्तर दिलं जाईल असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - अहिल्यानगरमध्ये झालेल्या तणाव प्रकरणात 30 जण पोलिसांच्या ताब्यात

Kalyan News : रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई; मुंबई-हावडा मेलमधून 1100000 रुपयांच्या अंमली पदार्थाची तस्करी, एकाला अटक

Mumbai To Pune Travel: मुंबई ते पुणे कसा कराल झटपट प्रवास; रेल्वे, बस, विमानसेवा की खाजगी वाहने, काय ठरेल बेस्ट

Maharashtra Politics: संजय राऊत आणि उद्धवजी पाकिस्तानच्या पराभवानंतर तुमच्या डोळ्यात अश्रू का? भाजप नेत्याचा सवाल|VIDEO

ST Bus: राज्यातील ३४ आगार प्रमुखांवर होणार कारवाई, प्रताप सरनाईकांचे आदेश; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT