Bachhu Kadu addressing media after opposing the education department’s decision on stray dogs in schools. Saam Tv
Video

...नाहीतर शिक्षणमंत्र्यांच्या घरात कुत्रे सोडू, बच्चू कडूंचा इशारा|VIDEO

Bachhu Kadu Warning Education Minister: शाळेतील भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी शिक्षकांवर जबाबदारी टाकण्याच्या निर्णयावर बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. निर्णय मागे घेतला नाही तर शिक्षणमंत्र्यांच्या घरात कुत्रे सोडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Omkar Sonawane

शाळेच्या आवारातील भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी शिक्षकांवर नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. अमरावती महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने हा अजब फतवा काढला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. यावर प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले असून बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना खडेबोल सुनावले आहे. हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा शिक्षणमंत्र्याच्या घरात कुत्रे सोडू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. शिक्षकाने कुत्र्याला सांभाळायचं आणि शिक्षकांनी किती कुत्रे सांभाळले हा पाठपुरावा आमदार करेल त्याचा पाठपुरावा देवा भाऊ करेल असे दिवस महाराष्ट्रात आले याचा आम्ही निषेध करतो. हा निर्णय वापस घेतला नाही तर शिक्षणमंत्र्याच्या घरात कुत्रे सोडू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

SCROLL FOR NEXT