Bachchu Kadu breaking the gate and leading farmers into Jalgaon Collector Office during protest. Saam Tv
Video

Bachchu Kadu: शेतकऱ्यांसह बच्चू कडू गेट तोडून जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले|VIDEO

Bachchu Kadu leads farmers’ protest in Jalgaon: जळगावमध्ये शेतकऱ्यांच्या हमीभाव, कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी काढलेल्या आक्रोश मोर्चात आमदार बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडून आत प्रवेश केला.

Omkar Sonawane

जळगाव : शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव, कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आज जळगावमध्ये भव्य शेतकरी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी केले. हजारोंच्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते.

मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निवेदन सादर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जिल्हाधिकारी बाहेर न आल्याने बच्चू कडू आक्रमक झाले. पोलिसांनी गेटवर रोखण्याचा प्रयत्न केला, तरीही कडूंनी स्वतः गेट उघडून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला.

यावेळी काही काळ जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. बच्चू कडू यांच्यासह विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात प्रवेश करून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

जिल्हाधिकारी निवेदन घेण्यासाठी स्वतः बाहेर का येऊ शकत नाहीत? असा थेट सवाल बच्चू कडूंनी जिल्हाधिकाऱ्यांना उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathwada Farmers Devastated: मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश; अतिवृष्टीने बळीराजा हवालदिल,ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी तीव्र

मीनाताईं ठाकरे पुतळा विटंबना प्रकरण; पुतळ्यावर लाल रंग फेकणाऱ्याला अटक

Thursday Horoscope : मनस्ताप वाढवणार, हातून चुका घडणार; 'या' राशीच्या लोकांना अडचणीचा काळ टाळून पुढे जावे लागणार

Neem Leaves: कडुलिंबाची पाने आहेत गुणकारी; त्वचा, केसांच्या समस्येसह मधुमेहावर ठरेल वरदान

UPI Cash Withdrawal: कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही UPI द्वारे आता घरीच कॅश मिळणार?

SCROLL FOR NEXT