Bacchu Kadu aggressively criticising Minister Gulabrao Patil over his controversial ‘Laxmi’ remark during a public interaction. Saam Tv
Video

Bacchu Kadu: नाही तर कुत्र्यानं ही विचारलं नसतं, बच्चू कडूंचा गुलाबराव पाटलांवर हल्लाबोल| VIDEO

FIR Demand Against Minister Gulabrao Patil By Bacchu Kadu: आमदार बच्चू कडू यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या ‘लक्ष्मी’ संबंधित वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. पैशाची मस्ती आली असून असे वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी कडू यांनी केली.

Omkar Sonawane

आमदार बच्चू कडू यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या एका वक्तव्यावरून तीव्र संताप व्यक्त केला आहे. गुलाबरावांना पैशाची मस्ती आली असून निवडणूक आयोग झोपा काढत आहे का? असा सवाल कडू यांनी केला आहे. बच्चू कडू यांनी म्हटले आहे की, अशी बोलणाऱ्याची मस्ती जिरवणं गरजेचं आहे आणि गुलाबराव तुम्हाला असं वाटत असेल की पैशानं सगळे लोक विकत घेतले जात आहे तर हे चुकीचं आहे. पाटील यांनी निवडणुकीपूर्वी 'लक्ष्मी' येण्याबाबत आणि 'नगरविकास खात्या'बद्दल केलेल्या वक्तव्यावर कडू यांनी जोरदार टीका केली. एका मंत्र्याने असे वक्तव्य करणे चुकीचे असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणीही बच्चू कडू यांनी केली. तुम्ही धर्माचं पांघरून घेतलं म्हणून वाचून आहात, नाहीतर कुत्र्यांनी ही विचारलं नसतं अशा शब्दात कडू यांनी पाटलांवर हल्लाबोल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

SCROLL FOR NEXT