Bacchu Kadu criticizes Manikrao Kokate after rummy video from Vidhan Bhavan goes viral, leading to removal from sports portfolio Saam Tv
Video

Manikrao Kokate: विधानभवनात रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंवर बच्चू कडूंचा प्रहार|VIDEO

Manikrao Kokate Playing Rummy: माजी मंत्री बच्चू कडू यांनी कोकाटेंवर विधानभवनातील रमी खेळप्रकरणी जोरदार टीका केली आहे. रमीमुळे शेतकरी व मजूर संकटात सापडत असल्याचं त्यांनी सांगत, कोकाटेंनी हा खेळ बंद करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

Omkar Sonawane

माजी मंत्री बच्चू कडू यांनी माणिकराव कोकाटे यांच्याकडे दिलेल्या क्रीडा खात्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर जोरदार फटकेबाजी केली. विधानभवनात कोकाटे रमी गेम खेळताना दिसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र त्यांच्या टीकेची झोड उठली होती. याच पार्श्वभूमीवर सरकारने त्यांच्याकडील क्रीडा खाते काढून ते दत्ता भरणे यांच्याकडे सोपवले. बच्चू कडू म्हणाले, रमी हा गेम क्रीडा क्षेत्रात आणू नका. हा गेम जर शासकीय पातळीवर मान्यता पावला तर मोठा प्रॉब्लेम होईल. कोकाटे यांनी आता तरी मेहरबानी करून रमी खेळणे बंद करावे, एवढीच अपेक्षा आहे. लाखो शेतकरी, मजूर या गेममुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे कोकाटे यांनी पुढाकार घेत हा गेम थांबवायला हवा.अशी टोलेबाजी कडू यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Afghanistan Pakistan Tension: अफगाणिस्तानने थोपटले दंड; पाकिस्तानच्या संरक्षणमंत्री आणि ISI प्रमुखांना व्हिसा देण्यास नकार

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांची महाष्ट्राच्या राजकारणात होणार एन्ट्री? कोण काय म्हणालं? वाचा स्पेशल रिपोर्ट

Nashik Crime: नाशिक जिल्हा....; पुस्तकांऐवजी बॅगेत कोयता अन् चॉपर, महाविद्यालीन विद्यार्थ्यांमध्ये भाईगिरीचे फॅड

Hindu Festivals: रक्षाबंधन आणि भाऊबीजमध्ये काय फरक आहे?

Virat Kohli : लिलावापूर्वी करार करण्यास नकार, IPL 2026 मध्ये विराट कोहली RCB कडून खेळणार की नाही?

SCROLL FOR NEXT