Partur VidhanSabha SaamTv
Video

VidhanSabha Maharashtra : आमदार बबनराव लोणीकर यांच्या अडचणी वाढणार ?

Partur VidhanSabha Update : परतूर विधानसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही जागा शिवसेनेला देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांनी केली आहे.

Saam Tv

जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. जालन्यातील परतूर विधानसभेच्या जागेवर महायुतीत शिवसेनेन दावा केला आहे. ही जागा शिवसेनेला सोडावी अशी मागणी जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्याकडे केलीय. परतूरमधून सध्या भाजपचे बबनराव लोणीकर ही अंदर आहेत. त्यामुळे आता परतूर विधानसभेच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच आल्याचे पाहायला मिळतेय. शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांनी केलेल्या मागणीमुळे आता आमदार लोणीकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिवसेनेला निवडून येण्यासाठी परतूर मतदारसंघ सोयीस्कर असल्याने ही जागा महायुतीने शिवसेनेला द्यावी. आम्ही लवकरच यासंदर्भात महायुतीच्या नेत्यांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT