माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणी चौथ्या आरोपीला मुंबई गुन्हे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. हरीशकुमार बालकरामा याल गुन्हे शाखेने अटक केली आहे. हरिषकुमार पुण्यातील एक स्क्रॅप डीलर असून हत्येच्या कटात पैसा तसेच इतर सहकार्य केल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर काही वेळातच दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता यातील चौथ्या आरोपीला देखील अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. हरिषकुमार या सगळ्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचं म्हंटलं जात आहे. हा सगळा कट त्याने रचला होता. हरिषकुमार पुण्यात स्क्रॅप डीलर म्हणून काम करतो. त्याने इतर आरोपींना पैशांसाह इतर गोष्टी पुरवल्या असल्याचा संशय आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला पुण्यातून मंगळवारी अटक केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.