nagpur violence  Saam Tv
Video

Nagpur Flash Update : नागपूर पेटलं; दोन गटात तुफान राडा, कारण काय? VIDEO

Nagpur Violence: राज्याच्या उपराजधानीत दोन गटांमध्ये जोरदार संघर्ष उफाळून आल्याने नागपूरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण शहराला छावणीचे स्वरूप आले असून, मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यभर सुरू असलेल्या वादाचा तीव्र प्रतिसाद नागपूरमध्ये उमटला आहे. महाल परिसरात दोन गटांमध्ये दगडफेक झाली असून, या घटनेत अनेक पोलिस गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी साडेसातच्या सुमारास एक गट मोठ्या संख्येने चौकाजवळ पोहोचला. या वेळी घोषणाबाजी सुरू झाली. दुपारी झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या गटाचा रोष होता. घोषणाबाजी सुरू होताच, प्रतिसाद म्हणून दुसऱ्या गटानेही घोषणाबाजी सुरू केली.

तणाव वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही गटांना वेगवेगळे करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी जमावाला शिवाजी चौकावरून चिटणीस पार्कच्या दिशेने हलवले. मात्र, चिटणीस पार्कच्या पलीकडे भालदारपुरा परिसरातून पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक सुरू झाली.

स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, मात्र जमावाने मोठ्या आकाराचे दगड फेकल्याने पोलिसांना अश्रूधाराच्या नळकांड्या (टिअर गॅस) वापरण्याची वेळ आली. या दगडफेकीत अनेक गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जमावाने एका क्रेनलाही आग लावली. ही आग इतकी भडक होती की अग्निशमन दलाच्या जवानांची देखील हिमत होत नव्हती.

सध्या पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला असून, शहरात शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

SCROLL FOR NEXT