Ashok Kharat Case ED Raid saam tv
Video

Ashok Kharat: अशोक खरातच्या घरात ई़डी, आलिशान कारसह मालमत्ताही होणार जप्त

Ashok Kharat ED action luxury car property seizure fraud case : महिलांवरील अत्याचार आणि फसवणूक प्रकरणात गुन्हे दाखल असलेला अशोक खरात याची आलिशान कार आणि मालमत्ता जप्त होण्याची शक्यता आहे.

Nandkumar Joshi, अभिजीत सोनावणे साम टीव्ही नाशिक

भोंदू अशोक खरातची आलिशान कार ईडीकडून जप्त केली जाण्याची शक्यता आहे. तसेच त्याच्या अन्य मालमत्ता देखील जप्त केल्या जाऊ शकतात. या कारची किंमत ८० लाख ते १ कोटीच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. पुण्याच्या एका भक्ताला गंडा घालून खरातने ही कार घेतल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित भक्तानेच यासंदर्भात तक्रार केली होती.

अशोक खरातच्या निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून झडती सुरू आहे. पहाटेपासूनच झाडाझडती सुरू होती. खरातने बेनामी संपत्ती जमवली असून, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणीही ईडीकडून सखोल तपास सुरू आहे. नाशिकच्या निवासस्थानी ईडी आणि प्राप्तीकर विभागाने संयुक्त कारवाई केली आहे. सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासूनच खरातचे नाशिकमधील घर, ईशान्येश्वर मंदिर यांसह ११ ठिकाणी ईडीकडून झाडाझडती सुरू होती. खरातच्या नाशिकच्या निवासस्थानी सात अधिकाऱ्यांच्या पथकाकडून झडती सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जोगेश्वरी पूर्वेत मातीने भरलेला डंपर बेस्ट बसवर कलंडला; महिला प्रवासी जखमी

Thane Crime : वर्गमित्रांनीच केला घात; संध्याकाळच्या वेळेला घराबाहेर बोलावलं, निर्जनस्थळी नेलं अन्... धक्कादायक कारण उघड

अभिजीत दीपके यांना जामीन मंजूर; न्यायालयानं कोणत्या ठेवल्या अटीशर्ती?

Pune : पांढरी वाळू, निळेशार पाणी अन् नारळ-सुरूची झाडं, पुण्याजवळ लपलाय 'हा' सुंदर समुद्रकिनारा

Stomach Pain: पोटदुखीला गॅस किंवा अॅसिडिटी समजून दुर्लक्ष करताय? मग शरीराने दिलेले हे गंभीर संकेत वेळीच ओळखा!

SCROLL FOR NEXT