Rupali Chakankar resignation 
Video

NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ गट? नेमकं कारण आले समोर

Rupali Chakankar resignation : रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची माहिती समोर आली आहे. एका गटाची राजीनाम्याची मागणी तर दुसरा गट विरोधात. सुनेत्रा पवार अजूनही निर्णयाच्या प्रतीक्षेत. संपूर्ण प्रकरण वाचा.

Namdeo Kumbhar

NCP split over Rupali Chakankar resignation controversy : रूपाली चाकणकर यांच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रूपाली चाकणकर यांचा महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून राजीनामा घेतला पाहिजे अशी एका गटाची मागणी आहे. तर राष्ट्रवादीतल्या दुसऱ्या गटाची चाकणकर यांच्या राजीनाम्यावर हरकत आहे. राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटाच्या राजकारणामुळे सुनेत्रा पवार यांनी अद्याप कुठलाही निर्णय घेतला नसल्याची सूत्रांची माहिती आहे.

गेल्या आठवड्यात रूपाली चाकणकर यांनी महिला आगोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. अशोक खरात प्रकरणात त्यांचे नाव समोर आल्यानंतर महायुती सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली होती. रूपाली चाकणकर यांचे महिला प्रदेशाध्यक्ष पदही जाणार असल्याचे बोलले जात आहे. पण आता पक्षात २ गट तयार झाल्यानंतर सर्वोच्च नेते कोणता निर्णय घेतात? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. पक्षातील या अंतर्गत गटबाजीमुळे आणि मतभेदांमुळे सुनेत्रा पवार यांनी अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पक्षांतर्गत या वादाचा पुढील काळात काय परिणाम होतो आणि रूपाली चाकणकर यांच्या पदाबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीडच्या परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे 2 गटात राडा

Weak Heart Signs: हातांमध्ये ही २ लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय कमकुवत झालंय

Sunday Horoscope: अचानक पैसा येईल, ५ राशींवर सुर्यदेव होणार प्रसन्न; वाचा रविवारचे राशीभविष्य

ICC Rules : क्रिकेट विश्वात उडणार खळबळ; आयसीसी बदलणार ४ नियम, सामना सुरू असतानाच चेंडू बदलणार रंग

Joint Pain Relief Tips: लहान वयातच तुम्हाला हाडं आणि सांधेदुखीचा त्रास होतोय का? या उपायांमुळे मिळेल आराम

SCROLL FOR NEXT