Joint Pain Relief Tips: लहान वयातच तुम्हाला हाडं आणि सांधेदुखीचा त्रास होतोय का? या उपायांमुळे मिळेल आराम

Shruti Vilas Kadam

नियमित व्यायाम करा

हलका व्यायाम, स्ट्रेचिंग आणि चालणे यामुळे सांधे लवचिक राहण्यास मदत होते. नियमित शारीरिक हालचाल केल्यास हाडे आणि स्नायू मजबूत राहू शकतात.

young joint pain | yandex

कॅल्शियमयुक्त आहार घ्या

दूध, दही, पनीर, बदाम आणि हिरव्या पालेभाज्या यांसारख्या पदार्थांमध्ये कॅल्शियम मुबलक असते. हे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करू शकते.

Joint Pain Relief | Instagram

शरीरात व्हिटॅमिन D ची कमतरता होऊ देऊ नका

सकाळच्या उन्हात काही वेळ घालवल्यास शरीराला नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन D मिळू शकते. हे हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

Joint Pain Relief Tips

वजन नियंत्रणात ठेवा

अधिक वजनामुळे सांध्यांवर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे गुडघेदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो. संतुलित आहार आणि व्यायामामुळे वजन नियंत्रणात ठेवणे फायदेशीर ठरते.

Joint Pain Relief Tips | yandex

पुरेशी झोप घ्या

अपुर्‍या झोपेमुळे शरीराचा थकवा वाढतो आणि स्नायूंमध्ये वेदना जाणवू शकतात. दररोज पुरेशी आणि चांगली झोप घेणे आवश्यक आहे.

Sleep | pinterest

जास्त वेळ एकाच जागी बसणे टाळा

ऑफिसमध्ये किंवा घरी दीर्घकाळ बसून राहिल्यास शरीर कडक होऊ शकते. दर काही वेळाने उठून चालणे किंवा स्ट्रेचिंग करणे फायदेशीर ठरू शकते.

young joint pain | yandex

वेदना सतत होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

सांधे किंवा हाडदुखी दीर्घकाळ कायम राहत असल्यास दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरू शकते.

Joint Pain

Saffron Milk Benefit: दररोज केशरच्या २ काड्या घातलेलं दूध प्या; तुमच्या शरीराला मिळतील हे आरोग्यदायी फायदे

Saffron Milk Benefit | Saam Tv
येथे क्लिक करा