Ashish Shelar on Black AND White Saam TV Marathi News
Video

Black And White : उद्धव ठाकरे बिनविरोध आमदार, त्यांनी राजीनामा द्यावा, आशिष शेलारांचं प्रत्युत्तर

Ashish Shelar statement : महापालिका निवडणुकीतील बिनविरोध नगरसेवकांवरून विरोधकांच्या आरोपांना भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे स्वतः बिनविरोध आमदार आहेत, मग त्यांनी राजीनामा द्यावा, असे शेलार म्हणाले.

Namdeo Kumbhar

Ashish Shelar on Black AND White : महापालिका निवडणुकीत महायुतीचे ६८ नगरसेवक बिनविरोध निवडून आले. त्यानंतर विरोधकांकडून गंभीर आरोप करण्यात आले. १० कोटी रूपये दिल्याचा दाखला संजय राऊतांपासून मनसेच्या अविनाश जाधव यांनी दिला. उद्धव ठाकरेंनीही बिनविरोध निवडणुकीवर टोला जहरी टीका केली होती. त्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलेय. उद्धव ठाकरे बिनविरोध आमदार आहेत, त्यांनीही राजीनामा द्यावा असे आशिष शेलार म्हणाले. साम टीव्हीच्या ब्लॅक अॅण्ड व्हाईट क्रार्यक्रमात त्यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. आशिष शेलार यांनी राज्यातील निवडणुका, सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप–प्रत्यारोप, राज्यातील सध्याची राजकीय स्थिती आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर भूमिका मांडली.

अर्जाची छाननी, चिन्हे देणे, अर्ज माघारी घेणे... ही सर्व कायदेशीर प्रक्रिया आहे. यापेक्षा काही वेगळे झाले असेल तर कोर्ट आहे. पण हे काही करायचे नाही, दाबून खोटं बोलायचं. बिनविरोध म्हणजे लोकशाहीला धोका असे खोटे बोलयचे.

१४ मे २०२० रोजी उद्धव ठाकरे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हतात. पण ते बिनविरोध निवडून गेले. स्वत: निवडून आले तेव्हा लोकशाही धोक्यात नाही. पण नगरसेवक निवडून आल्यावर चालत नाही. उद्धव ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे शेलार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thick Curd: पावसाळ्यात घरच्या घरी घट्ट दही कसं लावावं?

Maharashtra News Live Update: भूकंपाच्या धक्क्याने नांदेड हादरलं, मध्यरात्री एक वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का

Pune Rain: पुण्यात पावसाचा कहर! ओढ्याला आलेल्या पूरात शेतकरी वाहून गेला, शेतामध्ये गेले असता भयंकर घडलं

Maval landslide: दरडीनंतर गाव रिकामं करण्याचा निर्णय महागात पडला, दुसरीकडे राहायला गेले अन् घरातलं सर्वकाही गेलं

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT