ARVIND KEJRIWAL REFUSES COURT APPEARANCE IN DELHI LIQUOR POLICY CASE Saam Tv
Video

Arvind Kejriwal : मद्य घोटाळा प्रकरणात ट्विस्ट; अरविंद केजरीवाल कोर्टात उपस्थित राहणार नाहीत, कारणही सांगितलं

Arvind Kejriwal Delhi Liquor Case : दिल्ली मद्य धोरण प्रकरणात अरविंद केजरीवालांचा मोठा निर्णय; न्यायमूर्तींसमोर हजर राहण्यास नकार. सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला.

Alisha Khedekar

ARVIND KEJRIWAL REFUSES COURT APPEARANCE IN DELHI LIQUOR POLICY CASE VIDEO दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली मद्य धोरण प्रकरणात मोठा निर्णय घेतला आहे. कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्दोष मुक्ततेच्या निर्णयाविरोधात तपास यंत्रणेने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर, या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांच्या खंडपीठासमोर होणार आहे. मात्र, केजरीवाल यांनी या न्यायमूर्तींसमोर हजर राहण्यास नकार दिला आहे.

केजरीवाल यांनी न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांना पत्र लिहून स्पष्ट केले की, ते स्वतः किंवा वकिलामार्फतही त्यांच्या समोर उपस्थित राहणार नसल्याचे म्हटले आहे. न्याय मिळण्याची अपेक्षा उरलेली नसल्याचे सांगत त्यांनी महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतल्याचेही नमूद केले आहे.

तसेच, आवश्यक असल्यास सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार ते राखून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांच्या भूमिकेमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून पुढील सुनावणी आणि न्यायालयीन प्रक्रियेवर याचा काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Junnar ST Bus Accident: गुंजाळवाडीजवळ शेगाव-कल्याण एसटीचा भीषण अपघात; दोन ते तीनवेळा उलटली बस, दोघांचा मृत्यू, १७ जखमी

चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाची आत्महत्या; नदीमध्ये सापडला मृतदेह

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! सिमेंट मिक्सरने दोघांना चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ८ वर्षीय अहानाने सोडले प्राण

Dagdusheth Halwai Ganpati: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

Diesel Crisis: परभणीत डिझेलची टंचाई, पेट्रोल पंपाबाहेर कॅन घेऊन रांगा; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT